महाराष्ट्र बातम्या

येत्या २४ तासांत मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज

मिलिंद तांबे

मुंबई: राज्यातील अनेक भागात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  ठाणे-रायगडसह 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. 

मुंबई, गोव्यातून घेतलेल्या रडार प्रतिमा सिंधुदुर्ग जवळील गोवा किनारपट्टीवर तीव्र प्रतिध्वनी दर्शविल्या आहेत. उत्तर गोवा आणि दक्षिण सिंधुदुर्ग किनारपट्टी, सावंतवाडी इत्यादीवर जोरदार वारा, वादळीवाऱ्याची शक्यता आहे. पुणे, नगर, रायगड जिल्ह्यात ही विजांचा कडकडाटासह पाऊसाची अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

गुरुवारी दिवसभर संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीवर पावसाळी वातावरण तयार झाले असल्याचे उपग्रह प्रतिमेत दिसून आले आहे. त्यावरून खबरदारी घेण्याची आणि सावधगिरी बालगण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. त्यामुळे आज आणि उद्या 9 जानेवारीला राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

थंडीचा जोर ओसरला

मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे. कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

weather alert rain update mumbai state Mumbai Regional Meteorological Department 9th january

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT