महाराष्ट्र

राज्यात सकाळी गारठा, तर दुपारी चटका 

सकाळवृत्तसेवा

पुणे - उत्तरेकडून वाहणारे जोरदार वारे आणि दुपारी वाढलेला उन्हाचा चटका, यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात तापमानात वेगाने बदल झाले आहेत. सकाळच्या वेळी गारठा, तर दुपारी वाढलेला उन्हाचा चटका, असे परस्परविरोधी तापमान सध्या राज्यात अनुभवायला येत आहे. 

राज्यात सर्वाधिक तापमान नगरमध्ये 37 अंश सेल्सिअस नोंदले गेले; तर महाबळेश्‍वर येथे नीचांकी 13 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. 

परस्परविरोधी हवामानामुळे राज्याच्या कमाल-किमान तापमानातील तफावतही वाढली आहे. राज्यात विविध ठिकाणी दोन्ही तापमानात फरक दिसून येत आहे. पुण्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2.3 अंश सेल्सिअसने कमी होऊन 31.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पण किमान तापमानात 3.7 अंश सेल्सिअसने वाढ होऊन मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत 17.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

पुढील तीन दिवसांमध्ये पुण्यात उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले. आकाश मुख्यत- निरभ्र राहणार असल्याने उन्हाचा चटका वाढणार असल्याचेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT