Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा; हायअलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update : राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सांगली, सोलापूरच्या विविध भागांत वादळी पाऊस पडला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, सांगली, सोलापूरच्या विविध भागांत वादळी पाऊस पडला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार-पाच दिवस राज्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अल्रर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

राज्यात वेळेआधीच पोहोचणार मान्सून!

‘मॉन्सून’चे महाराष्ट्रातील आगमन काही तासांवर येऊन ठेपले आहे. गोव्यात दाखल होत मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. उद्या (ता. ६) मोसमी वारे तळकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव जिल्ह्यांत दाखल होण्याची शक्यता आहे.

तर १० जूनपर्यंत विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रगती होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT