rain Maharashtra Weather forecast sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात आज मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

राज्यात ६ ते १० जानेवारीला काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर भारतात सातत्याने निर्माण होत असलेले पश्‍चिमी चक्रावात आणि त्यात अरबी समुद्रातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) तुरळक ठिकाणी शुक्रवारी (ता. ७) मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात (Vidarbha) तुरळक ठिकाणी गारपीट होऊ शकते. काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल. तर विदर्भात ९ जानेवारीला गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. राज्यात ६ ते १० जानेवारीला काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणामस्वरुप देशातील काही राज्यात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रावरही पावसाचे सावट असून विदर्भासह मराठवाड्यात जास्त प्रभाव असू शकतो. शुक्रवारी (७ जानेवारी) नाशिकला (Nashik) पाऊस झाला आहे. तर धुळे (Dhule) नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), अहमदनगरमध्ये (Ahamednagar) आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय ८ तारखेला ठाणे (Thane), पालघर (Palghar), उत्तर महाराष्ट्रासह (Uttar Maharashtra) विदर्भात पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. तर ९ तारखेला मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात वाढ होत असून थंडी कमी झाली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान १३ ते २१ अंशाच्या दरम्यान, तर कमाल तापमान २८ ते ३२ अंशांदरम्यान नोंदले जात आहे. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३२.८ अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमानाची नोंद गोंदिया येथे १२.५ अंश सेल्सिअस इतकी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT