Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: मतमोजणीच्या दिवशी बरसणार पाऊस; पूर्व मोसमीसाठी पोषक हवामान

Weather Update: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे

सम्राट कदम

पुणे: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यास सोमवार (ता.३) नंतर ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष म्हणजे तीन दिवस आधीच ४ जून ला नैऋत्य मोसमी वारे तळकोकणात दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे.

जूनच्या पहिल्याच दिवशी शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आकाश मुख्यतः निरभ्र होते. अंशतः ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी उकाडाही जाणवला होता. शनिवारी शहरातील सरासरी कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. रविवारी (ता. २) देखील हवामानाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.

मात्र सोमवारनंतर जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे त्यानंतर शहर व जिल्ह्यात पावसाला सुरवात होण्याची दाट शक्यता आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी मॉन्सून जिल्हा व्यापण्याची शक्यता आहे.

मॉन्सूनची वाटचाल ‘मंदावली’

केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनची वाटचाल शनिवारी मंदावली होती. रविवारी (ता. २) मॉन्सूनचे प्रवाह वेग धरण्याची शक्यता असून, ४ जून पर्यंत तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

Latest Marathi News Live Update : पावसाने मुंबईकरांचे हाल, वेस्टर्न एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

'हेरा फेरी 3'ला मोठा धक्का? दिग्दर्शनाबाबत निर्मात्यांचा मोठा खुलासा

Fifa World Cup: किलियन एम्बापेचा जलवा... Golden Boot च्या शर्यतीत मेस्सीला मागे टाकले; फ्रान्स, नॉर्वे अन् मेक्सिको Round of 16 मध्ये

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT