Mumbai Rain Updates esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्याच्या काही भागात मुसळधार तर काही भागात अद्याप प्रतीक्षाच! आज 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, तर काही जिल्हे अद्याप कोरडे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यामध्ये गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भांगामध्ये सध्या शेती कामांना वेग आला आहे. तर राज्याच्या काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे.

कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रीय होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. तर राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल जवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT