heavy rain in mumbai andheri thane marathi rain Updates  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Rain : अरे काय चाललंय? मुंबईत धो-धो पाऊस; रात्रीपासून धुमाकूळ सुरुच

पावसामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचं सावट आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस बरसला आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला असून इतर भागांमध्येही पावसाची शक्यता आहे. (Mumbai Rain updates)

येत्या ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

मुंबई उपनगरातील अंधेरी, वर्सोवा, बोरिवली परिसरात रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली दहिसर या सर्व परिसरामध्ये पाऊस सुरू आहे. दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्येही मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे. तर पुण्यातही ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT