weather update rain forecast Stormy rains in state rain alert in this district  sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : वादळी पावसाने राज्यात धुमाकुळ

घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र झालेला कमी दाबाचा पट्टा आणि कोकण किनारपट्टीलगत तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता.१२) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा, तर पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर उर्वरित राज्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

रविवारी राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी सिंधूदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापुरात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पूर्व विदर्भातही वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोलीत बहुतेक भागातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यभर जोरदार पाऊस पडले, असे संकेत हवामान खात्याने दिले. या काळात घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे असून, हा पट्टा गुजरातच्या नालिया, अहमदाबाद, ब्रह्मपुरी, जगदलपूर, तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे.

ठळक कमी दाब क्षेत्र झाले तीव्र

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत तीव्र झाले आहे. ही प्रणाली ओडिशाच्या भवानीपट्टणनपासून ८० किलोमीटर आग्नेयेकडे, गोपाळपूरपासून ११० किलोमीटर पश्चिमेकडे, छत्तीसगडच्या जगदलपूरपासून आग्नेयेकडे २१० किलोमीटर अंतरावर आहे. ही प्रणाली दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगडकडे सरकताना पुढील २४ तासात हळूहळू निवळण्याची शक्यता आहे.

२७ गावांचा संपर्क तुटला

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नद्यांनी पूररेषा ओलांडली. माणगाव खोऱ्यातील आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने २७ गावांचा संपर्क तुटला; तर तेरेखोल नदीचे पाणी बांदा शहरात शिरल्याने तारांबळ उडाली. अनेक मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. शेकडो एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली. पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर

सिंधुदुर्ग : रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने नद्या भरून वाहत आहेत.

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले

सातारा : कोयना परिसरात; कराड, पाटण, सांगलीमध्ये सावधानतेचा इशारा

बुलडाणा : अतिवृष्टी, वादळी वाऱ्यामुळे कपाशी, मक्याचे नुकसान

चंद्रपूर : अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन

जालना : जिल्ह्यांत सर्वत्र मुसळधार पाऊस

सोलापूर : निलंगा येथे पूर आल्याने जनजीवन विस्कळीत

पुणे : शहर आणि परिसरात संध्याकाळी मुसळधार

सावधगिरीचा इशारा

  • मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

  • रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर

  • जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

  • मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : तिघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा खात्मा, पिंपरखेडमध्ये शार्पशूटरने झाडल्या गोळ्या

Pune Weather : पुणे गारठणार! पुढील 3-4 दिवसांत तापमानात मोठी घट; हवामान विभागाचा अंदाज

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

SCROLL FOR NEXT