Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस; राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई, नवी मुंबईसह इतरही भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढला

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात काही भागात पावसाचा जोर दिसून येत आहे. तर काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळपासून मुंबईत पावसाने पुन्ही हजेरी लावली आहे. (Latest Marathi News)

तर मुंबई, उपनगर परिसरात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर दिसून येत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर आज वाढला आहे. तर अंधेरी सबवे पाणी साचल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे, सबवेखाली दीड ते दोन फूट पाणी साचलं आहे. तर मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. (Marathi Tajya Batmya)

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भासह कोकणात पावसाची हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्याच्या उर्वरित भागात आता पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची हजेरी असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Latest Marathi News)

राज्यात पुढचे 4-5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच कोल्हापूर, सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT