Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यासह देशाच्या हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. राज्याच्या काही भागात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित राज्यामध्ये उकाडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहेत.

राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 16 एप्रिल आणि 17 एप्रिलला उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत मात्र हवामान कोरडं राहणार असून काही भागात तापमान वाढीची शक्यता आहे.

कोणत्या राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरापासून ईशान्य भारतापर्यंत नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. 16 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT