Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 'या' भागात पावसासह गारपीटीची शक्यता! काही भागात गारठा वाढला, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update : राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Weather Update : राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशातच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह, दिल्ली, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांमध्ये पुढील एक-दोन दिवसांत मुसळधार पावसासह गारपीटीची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टी होत असल्यामुळे उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेनं येत आहेत. परिणामी मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं आहे. येत्या ४८ तासांत राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीसह अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

त्याचबरोबर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. तर मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला आहे. रविवारी संध्याकाळनंतर वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला. तर कर्नाटक राज्यात तीव्र उष्णता जाणवत आहे.

दरम्यान, राज्यात झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. गहू, बाजरी, लिंबू, द्राक्ष, टरबूज पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा अन्... प्रशासनाने व्हिडिओ समोर आणल्याने प्रकार उघड

Latest Marathi News Updates : 'कोल्हापूर सर्किट बेंच'चे आज सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्‍घाटन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेते राहणार उपस्थितीत

मुकेश खन्नाने ‘रामायणम्’ला का नकार दिला? कारण ऐकून चाहत्यांना धक्का, जय बच्चनबद्दल सुद्धा मांडलं मत

Buldhana : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची नदीत उडी, ४४ तासांनी १४ किमीवर गाळात रुतलेला मृतेद सापडला; नागरिक संतप्त

Raj–Uddhav Alliance: राज–उद्धव युतीचा बिग गेम! चार महापालिका काबीज करण्याचा मास्टरप्लॅन उघड, भाजप-शिंदे सेनेसमोर महाअडथळा

SCROLL FOR NEXT