Maharashtra Rain Alert Sakal
महाराष्ट्र बातम्या

सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांना मिळणार दिलासा, दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या २९ मार्चपासून विदर्भात उष्णतेची लाट (Vidarbha Heat Wave) होती. अकोला रविवारी देशातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला. त्यापाठोपाठ बुलडाण्यातही उन्हाचा तडाखा जाणवला. पण, आता विदर्भातील काही उष्ण जिल्ह्यांना या उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. विदर्भातील उष्ण जिल्ह्यात चार आणि पाच एप्रिलला मेघगर्जनेसह (Vidarbha Rain Alert) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

येत्या चार ते पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह (Maharashtra Rain Alert) जोरदार पावसाची शक्यता आहे. याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांना तात्पुरता दिलासा मिळणार असून ४ एप्रिलला अकोला, बुलडाणा, गडचिरोली या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर ५ एप्रिलला अकोला, बुलडाणा, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये जोरदार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रविवारी अकोला सर्वाधिक हॉट -

रविवारी उष्णतेच्या लाटेचा शेवटचा दिवस होता. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान ४० ते ४२ अंशाच्या वर पोहोचले होते. अकोला देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले होते. अकोल्यात ४४ अंश तापमानाची नोंद झाली असून जगातील सातव्या क्रमांकाचं शहर ठरलं. यापाठोपाठ बुलडाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात देखील ४० अंशाच्यावर तापमान होतं. या जिल्ह्यांना आता तात्पुरता दिलासा मिळणार आहे. पण, १५ एप्रिलनंतर आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही पाऊस -

आज चार आणि उद्या पाच एप्रिलला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये हनुमान जयंती निमित्ताने 51 फूट उंच मारुती च्या दर्शनाला गर्दी

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT