Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात पुढील ४ दिवस पावसाची शक्यता; मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावत आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन दिवाळीमध्ये पावसाने हजेरी लावल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा गोंधळ उडाला. काल (गुरुवारी) मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या देखील घटना देखील घडल्या. तर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

आगामी ४ दिवसांमध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबईत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी केला आहे. तर येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पावसातच जाणार असल्याचा अंदाज आहे. आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये काल(गुरुवारी) रात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही मुसळधार पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT