महाराष्ट्र बातम्या

Jayakwadi Dam: "जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय कशाच्या आधारे घेतला"; हायकोर्टाचा सरकारला सवाल

हायकोर्टानं जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास स्थगिती दिलेली नाही

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिलेली नाही. मात्र, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय कशाच्या आधारे घेतला, याचं स्पष्टीकरण येत्या २० नोव्हेंबरपर्यंत हायकोर्टाचे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांनी मागितलं आहे. (what basis was decision taken to release water for Jayakwadi Dam Mumbai HC question to govt)

सरकारकडं मागितलं स्पष्टीकरण

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी भास्कर आवारे, सर्जेराव कोकाटे, आबासाहेब जाधव यांच्यावतीनं जायकावाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर काल झालेल्या सुनावणीत हे स्पष्टीकरण मागविण्यात आलं.

याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वकील नितीन गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना, कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालाच्या आधारे, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २०१४ च्या आदेशाची अंमलबजावणी करू नये. जलसंपत्ती प्राधिकरणाचा फेरनिर्णय येत नाही, तोपर्यंत समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या आधारे जायकवाडी पाणी सोडू नये. (Latest Marathi News)

फेरआढावा घेण्यात यावा

गोदावरी अभ्यास गटाच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १९ सप्टेंबर २०१४ रोजी पाणी सोडण्याबाबतचे गायडिंग प्रिन्सिपल जाहीर केले होते. या गायडिंग प्रिन्सिपलचा दरवर्षी फेरआढावा घेण्यात यावा, असं त्यावेळी हायकोर्टानं त्यांच्या आदेशात नमूद केलं होतं. परंतु महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं आजपर्यंत फेरआढावा घेतला नाही. त्याबाबत कोणतीही अंमलबजावणी केली नाही. (Marathi Tajya Batmya)

या कारणास्तव राज्य सरकारकडून नवीन अभ्यास गटाची समिती स्थापन केली आहे. या अभ्यास गटाच्या समितीचा अहवाल येईपर्यंत व रिव्ह्यूबाबत नवीन गायडिंग प्रिन्सिपल येईपर्यंत जायकवाडीला पाणी सोडू नये, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आला.

कशाच्या आधारे पाणी सोडल?

कोर्टानं त्याची दखल घेतली व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने कशाच्या आधारे पाणी सोडण्याचे आदेश दिले? उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत काय कार्यवाही केली? तसेच फेरआढावा का घेतला नाही? याबाबत सरकारी पक्षाकडून येत्या २० नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण मागितले. यावर आता पुढील सुनावणी येत्या ५ डिसेंबरला होणार आहे.

संपादकांचा खुलासा

काल मंगळवारच्या (ता.७ ) ‘सकाळ’च्या नगर आवृत्तीच्या अंकात 'जायकवाडीला पाणी सोडण्यास स्थगिती', अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. मात्र, प्रत्यक्षात मुंबई हायकोर्टानं अशा स्वरूपाची स्थगिती दिलेली नाही. अनावधानानं हा मथळा देण्यात आला. वाचकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी हा खुलासा करीत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT