NDA Meeting Esakal
महाराष्ट्र बातम्या

NDA Meeting: दिल्लीत बंद दाराआड घडलं नेमकं काय? PM मोदी, अजित पवार अन् अमित शाह यांच्यात झाली 'या' विषयांवर चर्चा

दिल्लीमध्ये PM मोदी, अजित पवार आणि अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

आगामी निवडणुकाच्या दृष्टीकोनातून सत्ताधारी आणि विरोधक यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणजे राजधानी दिल्लीत काल भाजप आणि मित्रपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एक वेगळा घटनाक्रम दिसुन आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात एक बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

तर या बैठकीमध्ये अजित पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह, प्रफुल पटेल यांच्यात चर्चा राजकीय विषयासोबत राज्यातील काही विकास कामांच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाहा आणि अजित पवार यांच्यात राज्यातील सहकार विषयवार प्रामुख्यानं चर्चा झाल्याची माहीती आहे.

तर या चर्चेमध्ये राज्यातील अडचणीत आलेले कारखाने आणि एफआरपी, पुण्याचे 391 कोटी आणि नागपूर मेट्रोचे रखडलेले सुमारे 500 कोटी रुपये मिळावेत याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी नाशिक हायवेवर पडलेले खड्डे तसेच ठाणे ते वडपे रस्ता दुरुस्तीबाबत देखील चर्चा केली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे.(Latest Marathi News)

NDAच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुन्हा बैठक झाल्याची माहीती आहे. अजित पवार, अमित शाह, जे पी नड्डा, प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये ही बैठक झाली आहे. तर या बैठकीतील चर्चा अद्याप गुलदस्त्यात आहे. बैठक संपल्यानंतर सर्व नेते बाहेर पडले, त्यानंतर या 4 नेत्यांत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे. यासंबधीचे वृत्त 'साम टीव्ही'ने दिले आहे.

तर NDA ची बैठक संपल्यानंतर पंतप्रधान मोदी जाण्यासाठी निघाले तेंव्हा त्यांना गाडीपर्यंत सोडवायला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल गेले होते.

भाजपकडून काल नवी दिल्लीत NDAची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली. या बैठकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock : 'या' एका स्टॉकने गुंतवणूकदारांची केली चांदी! तुमची १ लाखाची गुंतवणूक आज झाली असती ६४ लाख रुपये...

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

Video : अर्जुन स्वतःच्या जीवाशी खेळून महिपतला पोलिसांच्या हवाली करणार ! नव्या ट्विस्टने प्रेक्षकही चकित

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

SCROLL FOR NEXT