परिशिष्ट-10  Sakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरे-शिंदेंचं भवितव्य ठरवणारं परिशिष्ट-10 म्हणजे काय?

Komal Jadhav (कोमल जाधव)

सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुनावणी झाली. यावेळी शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी आणि ठाकरे समर्थक आमदारांची बाजू कपिल सिब्बल यांनी मांडली. यावेळी दोन्ही वकीलांकडून वारंवार संविधानातील परिशिष्ट १० चा दाखला देत बंडखोरांविरोधात बाजू मांडण्यात आली, त्यामुळे आता परिशिष्ट १० म्हणजे नेमकं काय? असा सवाल उपस्थित झालाय.

परिशिष्ट १० म्हणजे नेमकं काय?

परिशिष्ट १० म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. पक्षांतर म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं. पण हितसंबंध पाहता कुणीही कुठेही पक्षांतर करु शकतात. त्यामुळे पक्षांतरावर निर्बंध आणण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आला. पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत तुम्ही निवडून आलेल्या पक्षाविरोधात मतदान करु शकत नाही.

पक्षांतर बंदी कायदा १९८५ साली राजीव गांधींच्या नेतृत्वातील सरकारनं आणला. त्याआधीपर्यंत कुणीही कुठल्याही पक्षात प्रवेश करु शकत होतं. त्यावर निर्बंध आणि मर्यादा नव्हत्या. पण पक्षांतर बंदी कायद्यानंतर सोयीप्रमाणे पक्ष बदलणाऱ्या आमदार, खासदारांवर नियंत्रण ठेवणं शक्य झालं. १९८५ साली संविधानात परिशिष्ट १० जोडण्यात आलं.

या परिशिष्ट १० नुसार एखाद्या लोकप्रतिनिधीनं पक्षांतर केल्याच्या कारणावरुन सभागृहातील इतर सदस्यांनी केलेल्या याचिकेनंतर संबंधित लोकप्रतिनिधीच्या सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार हा पीठासीन अधिकारी म्हणजे विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलाय. पक्षाचा आदेश म्हणजेच व्हिप अमान्य केल्यास किंवा पक्षाचा राजीनामा दिल्यास त्यांच्या सदस्यत्वही आपोआप रद्द होतं. त्यामुळे पक्षांतर केल्यास लोकप्रतिनिधींची आमदारकी, खासदारकीही रद्द होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

आता पक्षांतरबंदी कायदा कधी लागू होतो?

  • कोणत्याही आमदार, खासदारानं पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर

  • निवडून आलेल्या आमदार, खासदारानं पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं असल्यास

  • निवडून आलेल्या सदस्यानं पक्षाचा व्हिप मानला नाही तर

पण, पक्षांतरबंदी कायद्याला एक अपवाद आहे म्हणजे कोणत्याही पक्षाचे दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही.

त्यामुळे आता एकनाथ शिंदेंना आपली आमदारकी राखायची असेल तर त्यांना भाजपात प्रवेश करावा लागेल आणि सोबतच दोन तृतीयांश आमदारांचं पाठबळही दाखवावं लागेल. आता सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाकडून आपली आमदारकी टिकवण्यासोबतच आपणच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

- कोमल जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT