online fraud sakal
महाराष्ट्र बातम्या

चक्री गेम म्हणजे काय? 1000 तरूणांची 36 कोटींची फसवणूक! कोणी जमीन विकली, सोने मोडले, कोणी व्याजाचे पैसे गुंतवले; पोलिसांनी दाखल केले 4983 पानांचे दोषारोपपत्र

जादा पैसे कमाविण्याचे आमिष दाखवून सोलापूर जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक जणांना ३६ कोटींचा गंडा घालणाऱ्या २३ जणांविरुद्ध पोलिसांनी माढा न्यायालयात तब्बल चार हजार ९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. संशयित आरोपी छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कुर्डुवाडी, बार्शी तालुक्यातील आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : कमी दिवसांत जादा पैसे कमाविण्याचे आमिष दाखवून सोलापूर जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक जणांना ३६ कोटींचा गंडा घालणाऱ्या २३ जणांविरुद्ध पोलिसांनी माढा न्यायालयात तब्बल चार हजार ९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. संशयित आरोपी छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कुर्डुवाडी, बार्शी तालुक्यातील आहेत. त्यांनी एकमेकांच्या ओळखीतून तरुणांना जादा नफ्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. एक रुपयाला ३६ रुपये मिळतात, असे त्यांचे आमिष होते.

ऑफलाइन मटका, जुगार खेळणाऱ्यांवर पोलिस उघडपणे कारवाई करतात म्हणून संशयित आरोपींनी ऑनलाइन चक्री गेमचा पर्याय शोधून काढला. एकमेकांच्या ओळखीतून त्यांनी सधन भागात एजंट तयार केले. त्यासाठी त्यांच्या माध्यमातून लोकांनी गुंतवलेल्या एकूण रकमेवर कमिशन देऊ केले. कमी दिवसांत गुंतवलेल्या रकमेवर ३६ पट रक्कम मिळते म्हणून सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः: बार्शी, माढा, माळशिरस अशा तालुक्यांमधील शेकडो तरूणांनी त्या चक्री गेममध्ये पैसे गुंतवले. त्यासाठी पैसे गुंतवणूक करेपर्यंत त्यांना पासवर्ड व आयडी दिला जात होता. अनेकांनी या गेमच्या नादात शेती, घरजागा विकली. अनेकांनी शेतावर कर्ज काढले, सावकारांकडून व्याजाने कर्ज घेतले. काहींनी घरातील दागिने विकले, गहाण ठेवले आणि पैसे त्या गेममध्ये गुंतवले.

माढा तालुक्यातील सात तरुणांनी एकत्र येऊन सोलापूर ग्रामीण पोलिसांत धाव घेत फिर्याद देण्याचे धाडस केले. कारण, मूळ फिर्यादीने या गेमच्या नादात स्वत:ची काही एकर जमीन विकली होती. पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन सखोल तपास केला आणि संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आतापर्यंत २३ जणांचा या गेममध्ये सहभाग आढळला असून त्यांनी एक हजारांहून अधिक जणांना सुमारे ३७ कोटींना गंडा घातला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

चक्री गेममधून अशी चालायची फसवणूक

आरोपीतांकडून पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले की फनरेप फनगेमचे डॅशबोर्ड ओपन होते. एजंटाकडून दिलेला खाते नंबर व पासवर्ड टाकल्यावर चक्री गेमचे खाते सुरु होते. त्यात मध्यभागी असलेल्या गोलाकार चक्रीमधील एक ते ३८ अंकापैकी एका अंकावर १ ते ५००० रुपयांपर्यंत पॉइंट (कॉइन) लावू शकतो. बेट लावण्यासाठी ४५ सेंकद दिले जातात. तो वेळ संपल्यानंतर चक्री फिरते व १० सेकंदात चक्री थांबते. त्यातील पांढऱ्या रंगाचा बॉल ज्या अंकाचे कप्यात बसेल, जो अंक विजयी ठरला. त्या कस्टमरला प्रती एक पॉइंटला ३६ पॉइंट चक्रीच्या आयडीवर जमा होतात. थोड्यावेळाने पुन्हा नव्याने दुसरा गेम सुरु होतो. जिंकलेले पॉइंट ग्राहकाने एजंटाच्या खात्यावर जमा केल्यास एजंट एक पॉइंटला ३६ रुपयांप्रमाणे रक्कम कस्टमरच्या खात्यावर जमा करतो. बॅलन्स संपल्यानंतर बॅलन्स सोडण्यासाठी नवीन खाते नंबर व पासवर्ड दिला जातो.

२३ जणांविरुद्ध माढा न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले

मोबाईलवरील ऑनलाइन चक्री गेमचे जाळे खूप दूरवर पसरले असून तपासाचा पहिला टप्पा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पूर्ण केला आहे. २३ जणांविरुद्ध माढा न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले आहे. पण, या गुन्ह्यात संशयित आरोपींसह चक्री गेममध्ये फसलेल्यांची व रक्कम वाढू शकते, त्यादृष्टीने आणखी तपास सुरू आहे.

- संजय जगताप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

Latest Marathi News Live Updates : पिकअप अपघातातील बाराव्या महिलेचा मृत्यू

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

SCROLL FOR NEXT