Devendra Fadanvis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: फडतूस म्हणजे काय? ठाकरे गटाच्या खासदाराने फडणवीसांना सांगितले चार अर्थ

उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस गृहमंत्री म्हंटल्यानंतर राजकीय वातावरण तापलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केला होता. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले. मी फडतूस नाही काडतूस आहे. मी गृहमंत्री आहे, याचीच अनेकांना अडचण आहे. पण मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. बेकायदेशीर काम करणाऱ्यांना तुरुंगात टाकणारच, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या व्यक्तव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लक्ष केलं आहे. इतकेच नव्हे तर खासदार संजय राऊत यांनी फडतूस या शब्दाचे चार अर्थ सांगितले आहेत. डिक्शनरीत हे अर्थ असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच कोर्टाने यापेक्षा अधिक कडक शब्दात तुमच्या सरकारवर ताशेरे ओढल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी सकाळी माध्यामांशी संवाद साधला यावेळी देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला लक्ष केलं आहे. डिक्शनरीत फडतूसचा शब्दाचा अर्थ दिलेला आहे. "वर्थलेस. मिनिंगलेस, यूजलेस आणि बिनकामाचे लोक आहेत", असा अर्थ डिक्शनरीत आहे असं ते यावेळी म्हणाले आहेत.

तर फडतूस हा शब्द आपण नेहमी वापरतो. हे सरकारच बिनकामाचं आहे, असं आपण नेहमी म्हणतो. त्यालाच उद्धव ठाकरे यांनी फडतूस हा शब्द वापरला आहे. त्यामुळे भिजलेलं काडतूस आत घुसायचं कारण नाही. तुम्ही काडतूस असाल हो अशी भिजलेली काडतूसं महाराष्ट्रात आम्ही खूप पाहिली आहेत. भिजलेली काडतूसं महाराष्ट्रात उडत नाहीत, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT