Prakash Ambedkar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : 'औरंगजेबच्या कबरीला फुलं वाहण्यामागे आंबेडकरांची भूमिका काय?' शिवसेनेने उपस्थित केला सवाल

संतोष कानडे

मुंबईः वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज खुलताबाद शहरातील औरंगजेबच्या कबरीला भेट दिली. या भेटीनंतर आंबेडकरांनी पतिक्रिया देताना औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं हे कोणला मिटवता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

यावर आता शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी बोलतांना, औरंगजेबच्या कबरीला फुलं वाहण्यामागे आंबेडकरांची भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर ते म्हणाले की, इथं भद्रा मारुतीचं मंदिर आहे. या मारुतीच्या मंदिराने देखील आम्हाला मदत केली आहे. त्यांना कसलाही आक्षेप नाहीये, त्यालाही मी असंच संध्याकाळी भेट देतो आहे. भारताच्या दृष्टीकोनातून खुलताबाद हे एक ऐतिहासिक शहर आहे. याचा लोकांनी विचार करावा. नावावरून जो भांडण लावण्याचा प्रकार चालला आहे त्यांना एवढंच सांगतो की, औरंगजेबाने पन्नास वर्ष राज्य केलं ते कोणाला मिटवता येणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काय म्हणाले संजय शिरसाठ?

  • औरंगजेबच्या कबरीला फुलं वाहण्यामागे प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय आहे?

  • प्रकाश आंबेडकरांनी असं केल्याने त्यांना मतं मिळणार नाहीत

  • मला हे अपेक्षित नव्हतं. त्यांच्यासारखा विद्वान नेता असं करेल वाटत नव्हते.

  • यामुळे त्यांच्याविषयी राग, द्वेष मनात आलेला आहे

  • प्रत्येकाला काहीतरी वेगळं ट्वीस्ट करायचं असतं. परंतु यांना लोकं चांगलं म्हणत नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli MIDC : सैनिक टाकळीत एमआयडीसीचा मार्ग मोकळा? तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी होणार उपलब्ध; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा दावा

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

Ganeshotsav: हिंदू धर्मात विसर्जनाचा उल्लेख आहे? लेखी पुरावा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींना या देशाबद्दल किंवा इथल्या लोकांबाबत अजिबात आदर नाही- भाजप खासदार प्रदीप कुमार सिंग

Maratha Reservation: टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच: मनोज जरांगे- पाटील; प्रमाणपत्र रद्द करून जातीयवादी भूमिका

SCROLL FOR NEXT