Sharad-Pawar
Sharad-Pawar 
महाराष्ट्र

शरद पवार पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडणार? महाराष्ट्राला उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसताना, ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागला. पण, त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून उघड-उघड वाद सुरू झाला आहे. या परिस्थितीत शरद पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.

गेल्या आठ दिवसांत राष्ट्रवादी-काँग्रेस आणि शिवसेना अशा नव्या समीकरणाची राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाली. त्यात समीकरणातून शरद पवार पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता शरद पवार आज, (6 नोव्हेंबर) मुंबईत दुपारी साडे बारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळं पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतरही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, 'जनतेने आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिला आहे. युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं सत्ता स्थापनेची जबाबदारी त्यांची आहे.', असं पवार यांनी स्पष्ट केलं होतं. पण, त्याचवेळी महाराष्ट्रात नेत्यांशी चर्चा करून पुन्हा भेट घेऊन निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे उद्या पत्रकार परिषदेत ते काय भूमिका मांडतात याकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, आज, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबईत राज्यपालांची भेट घेऊन अवकाळी पावसामुळं नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली. त्या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रचे गटनेते अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळीही अजित पवार यांनी सत्तास्थापने संदर्भात भाष्य केले  होते. आता उद्या शरद पवार काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT