Ajit Pawar and chandrashekhar bawankule 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : जे ठरलं होतं तेच झालं; अजित पवारांच्या पुण्याच्या पालकमंत्रीपदावर बावनकुळेंचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाली आहेत. पुण्याचे पालकमंत्रीपद चर्चेचा विषय ठरला होता. मात्र आजअखेर त्याचा तिढाही सुटला. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजपनेते चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुण्याचा कारभार देण्यात आला आहे. अजित पवार यांच्या नाराजीमुळे त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद दिल्याची चर्चा आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बावनकुळे म्हणाले की, पालकमंत्री बदलणे हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. जे ठरलं होत तेच झालं आहे. अजित पवार कधीही नाराज नव्हते. ते स्पष्टवक्ते आहेत. हे पहिलचं ठरल होतं, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बनणार आहेत.

काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या रक्तात कन्फ्युज करण्याचे राजकारण आहे. काँग्रेसमध्ये ब्लड कॅन्सर आहे.

एमके स्टॅलिन यांच्या हिंदू संस्कृतीबाबतच्या भूमिकेवर बावनकुळे म्हणाले की, स्टॅलिन यांनी जाहीर केलं की देशात आमचं सरकार आलं तर आम्ही देशातील हिंदू संस्कृती नष्ट करून टाकू. मला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना प्रश्न विचारायचे की, हिंदू संस्कृती संपवू म्हणणारे घटक पक्ष तुम्हाला मान्य आहे का? मान्य नसेल तर युती तोडावी, असही बावनकुळे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT