Dhanajay Munde Meets Devendra Fadnavis friendship esakal
महाराष्ट्र बातम्या

Beed: धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची Friendship कधी पासून सुरु झाली ?

Santosh Deshmukh murder case and its impact on Munde-Fadnavis alliance: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे विरोधक धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत. मात्र, वाढत्या दबावाच्या परिस्थितीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप मुंडे यांच्या समर्थनार्थ उभे असल्याचे दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्याच्या महाराष्ट्रात राजकीय गणिते दर काही महिन्यांनी बदलली जातात. युती आघाडी वारंवार बदलते पण य सगळ्या बदलामध्ये एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री.

राजकारणापलीकडची एक नाळ

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते आहेत, तर देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. राजकीय मतभेद असूनही, त्यांच्यातील स्नेहाचे नाते अनेकदा चर्चेचा विषय ठरते. या आधी धनंजय मुंडे हे विरोधी पक्ष नेते होते तर देवेंद्र फडणवीस सत्ताधारी पण या काळात दोघांच्या मैत्रीत खंड पडला नाही. उलट दोघांनी पडद्याआडून एकमेकांना केलेली मदत ही राजकीय वर्तुळात चर्चली जायची.

मध्यंतरी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जेव्हा सरकार स्थापन केलं होतं तेव्हा त्या पहाटेच्या शपथविधीमागे धनंजय मुंडे आणि फडणवीस यांची मैत्रीचं कारणीभूत होती असा दावा केला जातो. त्या रात्री अचानक मुंडे यांचं नॉट रिचेबल होणं यामागे फडणवीस होते का अशी शंका उपस्थित केली गेली. तर धनंजय मुंडे यांना अडचणीत आणणाऱ्या करुणा मुंडे प्रकरणात देखील देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका करायचं टाळलं होतं. पुढे अजित पवारांनी बंड केलंच व ते महायुतीत सामील झाले तेव्हा झालेल्या राजकीय वाटाघाटीत धनंजय मुंडे आघाडी वर होते असं म्हंटलं गेलं.

सध्या सुरू असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे विरोधक धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत. पण मुख्यमंत्रिपदी असलेले देवेंद्र फडणवीस मात्र दबाव वाढला असला तरी अजूनही मुंडे यांच्या पाठीशी उभे असलेले दिसून येत आहेत.

अशावेळी प्रश्न पडतो या दोन नेत्यांची मैत्री सुरु झाली तर कधी ?

धनंजय मुंडे हे भाजपचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे. बीड जिल्ह्यातील परळी येथे एका सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत परिश्रम पूर्वक भारतीय जनता पक्षात आपलं स्थान निर्माण केलं. प्रमोद महाजन यांच्या साथीने त्यांनी पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवलं.

महाजन आणि मुंडे ही जोडी जेव्हा नागपूरला जायची तेव्हा त्यांचा मुक्काम तिथले विधानपरिषद सदस्य असलेल्या गंगाधरपंत फडणवीस यांच्या घरी असायचा. याच गंगाधर फडणवीस यांचे सुपुत्र म्हणजे देवेंद्र. तेव्हापासूनच मुंडे आणि फडणवीस यांच्यात घरगुती संबंध निर्माण झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर देवेंद्र यांना राजकारणात आणण्यात आणि त्यांना महापौर पुढे आमदार बनवण्यात गोपीनाथ मुंडे यांची भूमिका सर्वात महत्वाची मानली जाते.

देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा मुंबईला यायचे तेव्हा ते गोपीनाथ मुंडे यांच्याच घरी राहायचे. विधानसभेत देखील ते दोघे एकत्रच असायचे.विधानसभेत एखाद्या विषयावर महत्त्वाची नोट बनवण्यासाठी, माहिती देण्यासाठी फडणवीस कायम गोपीनाथ मुंडेंच्या सोबत रहायचे."

याच काळात धनंजय मुंडे यांची देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगली मैत्री निर्माण झाली. 2000 ते 2004 च्या काळात मुंडे भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. युवा मोर्चात असताना त्यांची देवेंद्र फडणवीस यांचे संबंध चांगलेच सुधारले. पुढे धनंजय मुंडे यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी वाद झाले आणि त्यातूनच त्यांनी भाजपला रामराम ठोकला. पुढे राष्ट्रवादीमध्ये जाऊन देखील धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं कायम राहिलं.

मधल्या काळात अनेक घडामोडी घडून गेल्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं मात्र आजही ही मैत्री कायम आहे. याचे राजकीय फायदे तोटे सहन करूनही त्यांनी आपली दोस्ती लपवलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुखापत झालेल्या शाहरुखला काही झालं तर इंडस्ट्रीसोबतच 'या' लोकांचंही दिवाळं निघेल; एकूण इन्व्हेस्टमेंट किती माहितेय?

Viral Video: शंभर रुपयात तीन पोरं, डील फिक्स! सायकल सोडून तिघांनी शेतात ठोकली धूम; व्हिडीओ तुफान व्हायरल

Latest Maharashtra News Updates : सोन्याने पुन्हा एक लाखाचा टप्पा ओलांडला

W,W,W,W,W! १७ वर्षीय फरहान अहमदची विक्रमी कामगिरी, हॅटट्रिकसह घेतल्या ५ विकेट्स

Crime: घोरपडीच्या गुप्तांगाची विक्री, ज्योतिषी अटकेत, नेमकं प्रकरण काय? घटना वाचून डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT