Devendra Fadnavis Uddhav-Thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

सेनेचा मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे संभाजीनगर केव्हा होणार? : देवेंद्र फडणवीस

'नामांतराबाबत दोन ओळींचा ठराव मंत्रिमंडळात का येत नाही ? '

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आम्हाला प्रश्न आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे संभाजीनगर केव्हा होणार? नामांतराबाबत दोन ओळींचा ठराव मंत्रिमंडळात का येत नाही, असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. आज सोमवारी (ता.१४) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय चर्चेत ते बोलत होते. औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुढे आणला जात आहे. (When Will Aurangabad Rename As Sambhajinagar, Devendra Fadnavis Ask CM Thackeray)

यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही ११ मार्च रोजी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नामांतराचा मुद्दा मांडला होता. ते म्हणाले होते, की औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तत्काळ पाठवावा. केंद्राने तो मंजूर न केल्यास मी निवडणूक लढविणार नाही, असा पण मुनगंटीवार यांनी व्यक्त केला होता.

आता मुख्यमंत्री ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात? यानंतर शिवसेनेची भूमिका काय असेल ? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजप (BJP) व शिवसेना (Shiv Sena) हे दोन्ही पक्ष सत्तेत असताना त्यावेळीच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर का करण्यात आले नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT