एटीएम शोल्डर सर्फिंग स्कॅम Esakal
महाराष्ट्र बातम्या

‘एटीएम’मधून पैसे काढायला गेल्यावर तुमचे कार्ड दुसऱ्याच्या हाती देऊ नका, अन्यथा...! उत्तर प्रदेशातील 2 चोरट्यांना फौजदार चावडी पोलिसांनी पकडले

बाळे व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एटीएम केंद्रावर पैसे काढायला गेलेल्या दोघांच्या कार्डची अदलाबदल करून चौघांनी एक लाख १९ हजार ५९३ रुपये लंपास केले होते. फौजदार चावडी पोलिसांत १२ सप्टेंबरला दोन गुन्हे दाखल झाले होते. गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोन संशयितांना जेरबंद केले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : बाळे व छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एटीएम केंद्रावर पैसे काढायला गेलेल्या दोघांच्या कार्डची अदलाबदल करून चौघांनी एक लाख १९ हजार ५९३ रुपये लंपास केले होते. फौजदार चावडी पोलिसांत १२ सप्टेंबरला दोन गुन्हे दाखल झाले होते. गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक श्री. क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोन संशयितांना जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

बाळे परिसरातील संतोष नगरातील श्रीशैल शिवशरण बंबासे हे १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास तेथील एटीएम केंद्रावर पैसे काढायला गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी थांबलेल्या चौघांनी पैसे काढून देण्याचा बहाणा करून बंबासे यांच्याकडील एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर कार्डची अदलाबदल करून पैसे निघत नसल्याचे सांगून दुसरेच कार्ड त्यांच्या हाती सोपविले. त्यानंतर चौघांनी बंबासे यांच्या खात्यातील ७१ हजार रुपये काढले. त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली.

एक तासाच्या अंतरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रावर ७१ वर्षीय रावसाहेब रामचंद्र लंगोटे (रा. मित्र नगर, पंढरपूर रोड, मंगळवेढा) यांच्यासोबत देखील तसाच प्रकार घडला. त्या चौघांनी लंगोटे यांचे ४७ हजार ५९३ रुपये लंपास केले. या प्रकरणी लंगोटे यांनीही फौजदार चावडी पोलिसांत धाव घेतली होती. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस संशयितांचा शोध घेत होते. गुन्हे प्रकटीकरण पथकाने अखेर त्यातील दोघांना त्याच दिवशी सायंकाळी बाळे परिसरात पकडले. आणखी दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. चौघेही उत्तरप्रदेशातील जुनागढचे असून सध्या ते मुंबईत रहायला आहेत.

मार्केट यार्डासमोर अपघात; गाडी दुरूस्तीवेळी सापडले

मुंबई-पुणेमार्गे चारचाकी कारमधून सोलापुरात आलेल्या उत्तरप्रदेशातील ते चौघे विजयपूर येथे देखील गेले होते. तेथून परत येताना मार्केट यार्डासमोर एका बुलेटस्वाराला त्यांनी विरुद्ध दिशेने येऊन उडविले होते. त्यावेळी त्यांच्या कारचे नुकसान झाले होते. शुक्रवारी (ता. १२) त्यांनी दोघांना फसविल्यानंतर संशयितांनी कार दुरुस्तीसाठी बाळे येथे गॅरेजमध्ये आणली होती. खबऱ्यांकडून पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे. अबुजैद गुलहसन (वय २०, रा. जुनागढ, उत्तरप्रदेश, सध्या रा. कुर्ला, मुंबई) व शफीक रईशउल्ला (वय २३, रा. जुनागढ, उत्तरप्रदेश), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रईशउल्ला हा कॅब ड्रायव्हर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहिद कपूरच्या आईनेच सांगितलं पंकज कपूरसोबतच्या घटस्फोटाचं कारण; म्हणाली- जेव्हा तुमचा नवरा...

Viral Video : नाकात साप घुसवला अन् तोंडावाटे बाहेर काढला, पठ्ठ्याचा कारनामा पाहून तुमचाही उडेल थरकाप, पाहा व्हिडिओ

Hajare Karandak : मुंबई संघाचा विजयी चौकार; ४४४ धावांचा डोंगर, सर्फराझचे झंझावाती दीडशतक

आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून 17 वर्षीय मुलीनं घेतला गळफास; चिठ्ठीत लिहिलं, 'मी एकटी पडलीये, माझ्या मृत्यूला..'

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये 'महायुती'चा गोंधळ! राष्ट्रवादीने २१ की ४१ जागा लढवायच्या? नेत्यांकडेच उत्तर मिळेना

SCROLL FOR NEXT