Road Accidents
Road Accidents Sakal
महाराष्ट्र

दंड वसूल करणारी यंत्रणा कुठयं? राज्यात दररोज ३७ जणांचा अपघाती मृत्यू! ३ वर्षांत ४१,०८३ जणांचा मृत्यू तर ५२,५४४ लोक गंभीर जखमी

तात्या लांडगे

सोलापूर : महामार्गांची कनेक्टिव्हीटी वाढली आणि वाहनांचा वेग वाढला. रस्त्यांवरील बेशिस्त वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व माल वाहतूक आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष, अशा कारणांमुळे १ जानेवारी २०२१ ते ३० ऑक्टोबर २०२३ या काळात राज्यातील ३७ हजार ९३० अपघातात तब्बल ४१ हजार ८३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोलापूर, नाशिक, नागपूर, नगर, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा जिल्ह्यांमधील महामार्गांवर अपघात व अपघाती मृत्यूची संख्या लक्षणीय आहे. दरम्यान, अपघात नियंत्रित व्हावेत म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील ज्येष्ठ खासदार व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा कार्यरत आहेत. त्यात परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम, पोलिस अशा सर्वच विभागांचे अधिकारी सदस्य असतात.

दरमहा समितीची बैठक व्हावी आणि अपघातप्रवण ठिकाणी ठोस उपाययोजना होणे अपेक्षित आहेत. मात्र, अनेक जिल्ह्यांमधील समित्यांची बैठक होते, पण कार्यवाही काहीच होत नाही. दुसरीकडे काही जिल्ह्यांच्या बैठकाच होत नाहीत, अशी चिंताजनक वस्तुस्थिती आहे. महामार्गांवर अनेक ठिकाणी रस्त्यालगतच वाहने उभी असतात, तरीपण ना टोल प्रशासनाकडून ना संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून कारवाई होते. अनेक ठिकाणी महामार्गांवर वीजेची सोय आवश्यक असतानाही काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे मागून धडक बसल्याने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे महामार्ग पोलिसांच्या रिपोर्टवरून स्पष्ट होते.

तीन वर्षातील रस्ते अपघात

  • एकूण अपघात

  • ३७,९३०

  • अपघाती मृत्यू

  • ४१,०८३

  • अपघातात गंभीर जखमी

  • २२,५७९

  • दररोज सरासरी मृत्यू

  • ३७

कारवाईची यंत्रणा स्ट्राँग, तरी अपघाती मृत्यू वाढलेलेच

बेशिस्त वाहनांवर करवाई करण्यासाठी आरटीओ अधिकारी, स्थानिक वाहतूक पोलिस व अधिकारी, महामार्ग पोलिस व इंटरसेप्टर वाहने अशी मजबूत यंत्रणा आहे. दंडाची रक्कम देखील आता दुप्पट, तिप्पट व पाचपट झाली आहे. तरीदेखील रस्ते अपघात व अपघाती मृत्यू वाढले आहेत, हे विशेष. वेगवेगळ्या महामार्गांवर बेशिस्त वाहनांवरील कारवाईसाठी संबंधित यंत्रणा उभारलेली असते, तरीदेखील अपघाती मृत्यू वाढले कसे, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

सलग ड्रायव्हिंगमुळे अनेकांचा घात

वाहनचालकांनी सलग चार ते पाच तास वाहन चालविणे अपेक्षित आहे. वाहन चालकाने काही ठरावीक तासानंतर विश्रांती घेणे गरजेची आहे, पण अनेकजण सलग आठ-दहा तास ड्रायव्हिंग करतात. दुसरीकडे दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर सर्रासपणे होत नाही. चारचाकीत बहुतेक लोक सिटबेल्टचा वापर करीत नाहीत. शाळा-महाविद्यालयात जाणारी मुले, कोचिंग क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलांकडे दुचाकी आहेत. अशा कारणांमुळे अपघात व अपघाती मृत्यू वाढल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT