Ajit Pawar and Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांना कोणी ऑफर देऊ शकतो, हाच मोठा जोक; जितेंद्र आव्हाड यांचं विधान

रवींद्र देशमुख

मुंबई - मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यातच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडून तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. तसेच शरद पवार यांना केंद्रीयमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार शरद पवार भेटीवर म्हटलं की, वडेट्टीवार काय म्हणाले याच्यावर मी स्पष्टीकरण देणं हास्यास्पद होईल. पण शरद पवारांना कोण ऑफर देऊ शकतो हे म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे. पवार साहेबांची उंची किती, त्यांची लोकसभेतील कारकीर्द किती? त्यांना कोण ऑफर देणार? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

जे कोणी काय बोलतात ते बोलू द्या. पवार साहेबांनी सांगोल्याच्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं आहे की, मी कुठेही जाणार नाही. मी जातीयवादी पक्षाची हातमिळवणी करणार नाही. मी पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता आहे. मी तेच विचार पुढे घेऊन जाणार आहे, असे त्यांनी म्हटल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या मागेपुढे संभ्रम निर्माण करायचा आहे, हाच एक उद्देश आहे. शरद पवार यांच्या विचारधारेत फरक पडलेला नाही. ते पुरोगामी विचार घेऊनच चाललेत यापुढे पुरोगामी विचार घेऊनच चालतील, असा दावाही आव्हाड यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT