Eknath Shinde News | Shiv Sena News
Eknath Shinde News | Shiv Sena News Sakal
महाराष्ट्र

Not reachable एकनाथ शिंदेंमुळे सत्तेच्या खुर्चीला धक्का? कोण आहेत शिंदे?

वैष्णवी कारंजकर

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचं कारण म्हणजे विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून म्हणजे कालपासून एकनाथ शिंदेंशी कोणताही संपर्क झालेला नाही. शिंदेंसोबतच शिवसेनेचे १३ आमदारही संपर्कात नाहीत. हे सर्वजण गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेंचं सरकारमधलं आणि शिवसेनेतलं महत्त्व काय? या सगळ्याबद्दल जाणून घ्या...(Who is Eknath Shinde, What is his importance in politics)

कोण आहेत एकनाथ शिंदे?

वयाच्या अठराव्या वर्षी एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांनी शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काही काळातच ते ठाण्यातल्या किसन नगरचे शाखाप्रमुख झाले. १९९७ साली त्यांना ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट मिळालं. त्यानंतर २००४ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. ते निवडून आले आणि तेव्हापासून ते सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले. त्यांनी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. सध्याच्या सरकारमध्ये ते नगरविकास खात्याचा कारभार सांभाळतायत. (Maha Vikas Aghadi Government)

एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतलं महत्त्व काय?

नम्र, मितभाषी अशी एकनाथ शिंदेंची ओळख आहे. २०१४ च्या निवडणुकीत जेव्हा मोदी लाट आली, त्यावेळी एकनाथ शिंदेंनी ठाण्यातला शिवसेनेचा करिश्मा कायम राखला. आनंद दिघे (Shivsena leader Anand Dighe) यांच्यानंतर शिवसेना टिकवण्यात एकनाथ शिंदेंचं मोठं योगदान मानलं जात आहे. ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखडी या मतदारसंघातून एकनाथ शिंदे निवडून येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT