Who is HK Patil mediates between Nana Patole and Balasaheb Thorat politics sakal
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thorat : पटोले आणि थोरातांमध्ये मध्यस्थी करणारे एच.के.पाटील नेमके कोण?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्यातला वाद आता चांगलाच पेटलाय

अक्षता पांढरे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्यातला वाद आता चांगलाच पेटलाय. पक्षात दोन गट पडलेत असं चित्र तयार झालंय. त्यात बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर तर थेट काँग्रेस हायकमांडला या वादाची दाखल घ्यावी लागलीये.

आणि येत्या निडवणुकांच्या पार्श्ववभूमीवर  थोरात आणि पटोलेंचा हा वाद मिटवण्यासाठी काँग्रेसने एका खास व्यक्तीवर हि जबाबदारी सोपवली आहे.  आणि ती  व्यक्ती यासाठी मुंबईत देखील दाखल झाली आहे. त्यामुळे जाणून घेऊ पटोले आणि थोरातांमध्ये मध्यस्थी करणारी ती व्यक्ती कोण आहे?

तर बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले काँग्रेसमधील मोठ्या पदावर काम करणारे मोठे नेते. पण बऱ्याचदा कारभारावरून दोघांचे खटके उडताना पाहायला मिळाले. मात्र नुकताच झालेल्या पदवीधर निवडणुकीवेळी या वादात मोठी ठिणगी पडली. झालं असं कि, विधानपरिषद निवडणुकीत नागपूर मतदारसंघात सुधाकर आडबाले यांना उमेदवारी देण्यावरून पटोले विरोधात होते,

पण स्थानिक नेत्यांच्या हट्टापायी आडबाले यांना संधी देण्यात आली. पण त्यामुळे विदर्भातील नेते पाटोलेंवर भडकले. असाच काहीसा प्रकार नाशिक पदवीधर मतदारसंघांत सुद्धा घडला.  याठिकाणी सत्यजित तांबे यांना निवडणूक लढवायची होती.  काँग्रेसचे अनेक नेते या गोष्टीवर सहमत होते . पण नाना पटोलेंचा इथेही विरोध होता.

त्यामुळे उमेदवारीसाठी एबी फॉर्म पाठवताना प्रदेशाध्यक्षध कार्यलयातून चुकीचे फॉर्म पाठवण्यात आले,  आणि त्यामुळे तांबे यांना अपक्ष उमीदवार म्ह्णून घोषित करण्यात आलं. पण यांनतर जेव्हा विधानपरिषदेच्या निकाल लागला. तर नागपूर आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी पटोलेंचा विरोध असणारी नेतेमंडळी मोठ्या मताधिक्याने निवडून आली होती.

यानंतर तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांच्यावर मोठे आरोप केले. पटोलेंच्या या कारभाराबाबत बाळासाहेब थोरातांना माहित होत पण त्यांनी रुग्णालयात असल्याने यावर बोलणं टाळलं. आणि नंतर यावर नाराजी व्यक्त केली. पण या घडामोडी घडताना एक नाव वारंवार आपल्या कानावर पडत होत, ज्यांना या सगळ्या कारभाराची माहिती होती. ते म्हणजे  राज्याचे प्रभारी एच. के. पाटील.  

म्हणजे जेव्हा सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा देखील त्यांनी एच. के. पाटील यांचा वारंवार उल्लेख केला. आता सुद्धा बाळासाहेब थोरातांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला आणि विदर्भातील नेत्यांसोबत दिल्लीला पटोलेंच्या कारभारावरून तक्रार केली तेव्हा एच. के. पाटील हे नाव समोर आलं. त्यामुळे एच के पाटील नेमके कोण आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय?

एच के पाटील कोण?

एच के पाटील म्हणजे हनुमंतगौडा  कृष्णगौडा  पाटील. जे कर्नाटकातील मोठी नेते आहेत. त्यांनी कर्नाटकात कृषी, जलसंपदा आसनी अनेक महत्वाची खाती सुद्धा सांभाळली आहेत. सध्या ते कर्नाटकातील गदग या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये काँग्रेस हायकमांडने त्यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवलं,  महाराष्ट्रात काँग्रेसच प्रभुत्व कायम राहावं. आणि पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी एच के पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.  

दरम्यान आता पटोले आणि थोरातांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एच. के. पाटील यांना मुंबईत पाठवलं आहे.  एच. के. पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरातांची भेट घेणार असून या भेटीत नेमकं काय घडतंय हे पाहावं लागणार आहे. पण त्यामुळे नाना पाटोले यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT