Who Is Ram Sutar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Who Is Ram Sutar: 99 वर्षांचे शिल्पकार उभारणार शिवरायांचा पुतळा? जाणून घ्या कोण आहेत राम सुतार

Shivaji Maharaj Statue: 1959 मध्ये सुतार यांनी माहिती वर दूरसंचार मंत्रालयात नोकरी सुरू केली. पुढे त्यांनी राजीनामा दिला आणि शिल्पकार म्हणून काम करण्यास सुरू केली. (Who Is Ram Sutar)

आशुतोष मसगौंडे

दोन दिवसांपूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यांवर सुमारे एक वर्षापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुर्घटना घडली होती. यानंतर राज्यभरात याविरोधात संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान या कामात हलगर्जीपण केलेल्या काँन्ट्रॅक्टर चेतन पाटीलला अटक करण्यात आली आहे, तर शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राजकोट किल्ल्याला भेट देत पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा निर्माण करण्यासंबंधी सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्याशी बोलणे झाले आहे."

99 वर्षांचे राम सुतार हे देशातील ख्यातनाम शिल्पकार आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुप्रदिद्ध पुतळे उभे केले आहेत. गुतरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळाही राम सुतार यांनीच उभारला आहे.

कोण आहेत राम सुतार?

राम वनजी सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत. त्यांच्या नावावर जगातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बवनवण्याचा विक्रम आहे. 99 वर्षांचे असलेल्या सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावी झाला आहे.

सुरुवातीला सुतार यांना श्रीराम कृष्ण जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील जे. जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते 1959 मध्ये सुतार यांनी दिल्लीत माहिती वर दूरसंचार मंत्रालयात नोकरी सुरू केली. इथे काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि शिल्पकार म्हणून काम करण्यास सुरू केली.

पुढे त्यांनी दिल्लीत त्यांचा शिल्पकलेचा स्टुडिओ सुरू केला आणि तेव्हापासून आजपर्यंत सुतार यांनी अनेक ऐतिहासिक पुतळे साकारले आहेत.

उल्लेखनीय काम

राम सुतार यांनी 1954 ते 1958 दरम्यान अजिंठा आणि एलोरा लेण्यांच्या अनेक पुरातन कोरीव कामांचा जीर्णोद्धार करण्याचे काम केले. मध्य प्रदेशातील 45 फूट उंचीचे चंबळ स्मारक हे सुतार यांच्या कारकिर्दीतील पहिले मोठे आणि कौतुक झालेले काम होते. हे स्मारक एका खडकापासून बनवण्यात आले होते आणि त्याचे अनावरण 1961 मध्ये करण्यात आले होते.

सुतार यांच्या इतर प्रसिद्ध शिल्पांमध्ये दिल्लीतील गोविंद बल्लभ पंत यांचा 10 फूट लांबीचा कांस्य पुतळा, बिहारमधील कर्पुरी ठाकूर आणि बिहार विभूती अनुग्रह नारायण सिन्हा यांचा पुतळा, अमृतसरमधील महाराजा रणजित सिंग यांचा 21 फूट उंच पुतळा आणि गुजरातमधील जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटी यांचा समावेश आहे.

पुरस्कार

1999 मध्ये, राम सुतार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री आणि नंतर 2016 मध्ये, पद्मभूषण पुरस्कार मिळाले आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये, सुतार यांना 2016 च्या सांस्कृतिक समरसतेसाठी टागोर पुरस्कार मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT