BJP-Maharashtra
BJP-Maharashtra 
महाराष्ट्र

कोण होणार महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता?; यांची नावे चर्चेत!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार असल्याचं जवळपास निश्चित झालयं. संभाव्य खातेवाटपाचीही चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी आता विरोधी बाकांवर बसणाऱ्या भाजपमधून विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाचे नाव पुढे येणार, याची उत्सुकता लागली आहे. 

सर्वांत मोठा पक्ष विरोधी बाकांवर 

भाजपने शिवसेनेच्या सोबतीने विधानसभा निवडणूक लढवली होती. गेल्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवून भाजपला जवळपास 122 जागा मिळाल्या होत्या. पण, यंदा शिवसेनेलासोबत घेतल्यानंतरही भाजपचे यश मर्यादीत राहिले. भाजपला 105 जागांवर समाधान मानावे लागले. काही अपक्षांनी पाठिंबा दिला तरी, बहुमताची गोळा बेरीज शिवसेनेशिवाय शक्य नव्हती. त्याचवेळी शिवसेना मुख्यमंत्रिपदावर आग्रही राहिल्यानं भाजप-शिवसेनेचा संसार तुटला.

सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेचा दावाही करता आला नाही. अखेर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे सत्ता समीकरण जुळले असल्यामुळे भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागणार हे निश्चित झाले आहे.

कोण होणार विरोधीपक्ष नेता? 

भाजपने विधानसभेचे गटनेते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली आहे. सभागृहात फडणवीस यांच्यासोबतीला काही मोजकेच अनुभवी नेते आहेत. निवडणुकीत राम शिंदे, पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, तर ज्येष्ठ नेते आणि विरोधीपक्षातील कामाचा अनुभव असणारे एकनाथ खडसे यांना पक्षाने तिकिट नाकारले. त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन हे नेते सभागृहात असणार आहेत. त्यामुळे या नेत्यांमधून कोणाची विरोधीपक्ष-नेतेपदी वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. 

पुन्हा विखे-पाटील?

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे समीकरण जुळत असतानाचा, विरोधीपक्षनेते पदी पुन्हा राधाकृष्ण विखे-पाटील, अशा आशयाचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राज्यात फडवणीस सरकार सत्तेवर असताना, विखे-पाटील यांनी साडे चार वर्षे विरोधीपक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती. पण, ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची साथ धरली. विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून त्यांना विजयही मिळाला. मात्र, सभागृहातील गणित बदललं.

अवघ्या दोन-तीन महिन्यांसाठी त्यांनी गृहनिर्माण खात्याची जबाबदारी सांभाळली होती. आता त्यांना पुन्हा विरोधी बाकांवर बसावं लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT