politician sakal
महाराष्ट्र बातम्या

लोकप्रतिनिधी गप्प का? सोलापूर जिल्ह्यात बनावट दारू निर्मिती, गावागावात हातभट्टीची, सोलापुरात विषारी ताडीची विक्री; महिलांची पोलिसांना निवेदने, तरी दारूबंदी होईना

देशी-विदेशी दारू महागल्याने सोलापूर जिल्ह्यात रात्रंदिवस हातभट्टीची निर्मिती सुरू असून ती गावागावात सहजपणे पोच केली होत आहे. दुसरीकडे सोलापूर शहर हद्दीत विषारी ताडीची खुलेआम विक्री सुरू आहे. तरीदेखील, लोकप्रतिनिधी गप्प का, असा सवाल महिला उपस्थित करीत आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : गावात गेला की हातभट्टी कोठे मिळते, याची माहिती गावातील लोकच देतात. हातभट्टी पिऊन काहीजण गावाच्या वेशीत पडलेले नेहमीच दिसतात. तरूणांच्या भविष्यासाठी गावागावातील महिलांनी पोलिसांना दारूबंदीसाठी निवेदने दिली, तरीपण पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला हातभट्टीमुक्त गावे करता आलेली नाहीत हे विशेष. आता देशी-विदेशी दारू महागल्याने सोलापूर जिल्ह्यात रात्रंदिवस हातभट्टीची निर्मिती सुरू असून ती गावागावात सहजपणे पोच केली होत आहे. दुसरीकडे सोलापूर शहर हद्दीत विषारी ताडीची खुलेआम विक्री सुरू आहे. तरीदेखील, लोकप्रतिनिधी गप्प का, असा सवाल महिला उपस्थित करीत आहेत.

राज्य सरकारने देशी-विदेशी दारूवरील टॅक्स वाढविला आहे. त्यामुळे आता १८० मिलीलिटर देशी दारूची बाटली ८० रूपये, मेड लिकर १४८ रूपये, भारतीय बनावटीची विदेशी दारू २०५ रूपये आणि विदेशी मद्याचे प्रिमीयम ब्रॅंड ३६० रूपयास झाली आहे. त्यामुळे अनेकजण देशी-विदेशी दारूऐवजी हातभट्टी किंवा विषारी ताडीकडे वळत आहेत. पोलिसांकडील माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची निर्मिती होते. सध्या देशी-विदेशी दारूचे दर वाढल्याने त्या हातभट्ट्या दिवस-रात्र पेटलेल्या दिसत आहेत. महागडी दारू पिणे परवडत नसल्याने अनेकांनी ब्रॅंड बदलला आहे. याकडे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळेत लक्ष न दिल्यास भविष्यात गावागावातील तरूण हातभट्टीच्या आहारी जातील आणि मृत्यूचे प्रमाण वाढेल, अशी भीती वर्तविली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात बनावट दारू निर्मिती

अकलूज (ता. माळशिरस) व चौभेपिंपरी (ता. माढा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यांवर धाडी टाकून ३० लिटर स्पिरीट, गोवा राज्यनिर्मित १५३ लिटर विदेशी मद्य, ८९ लिटर बनावट विदेशी मद्य, विदेशी मद्याचे तेराशे बनावट लेबल, दीड हजार बुच, रिकाम्या बाटल्या, तसेच बाटल्या सिल करण्याचे दोन सिलिंग मशिन जप्त केली. या प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.

जिवघेणी हातभट्टी अन्‌ ताडीची खुलेआम विक्री

राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) १ ते २४ जुलै या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील हातभट्टी निमिती केंद्रावर व अवैध देशी-विदेशी मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. त्यात ५८ हजार लिटर गूळमिश्रित रसायन, तीन हजार ८९४ लिटर हातभट्टी, साडेआठशे लिटर देशी-विदेशी मद्य, ७९८ लिटर ताडी जप्त केली आहे. २४ दिवसांतील कारवाईत ‘एक्साईज’च्या पथकांनी ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुसरीकडे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत मात्र सातत्य दिसत नाही आणि सोलापूर शहर पोलिसांना तर शहरातील ताडी, हातभट्टी विक्री अद्याप दिसलेलीच नाही हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात! सात ते आठ वाहनं एकमेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू

IND vs ENG 4th Test: बेन स्टोक्सचे खणखणीत शतक! भारतीय गोलंदाज प्रयत्न करून दमले, इंग्लंडसाठी नवा इतिहास रचला

Shukra Bhraman 2025 : मिथुन राशीतील शुक्राचं भ्रमण या राशींना देणार भरपूर लाभ; राशीनुसार जाणून घ्या परिणाम

Manikrao Kokate : 'रमी' वाद भोवला: धुळ्यात कृषिमंत्री कोकाटे यांना काळे झेंडे व पत्त्यांच्या माळा दाखवून निषेध

Ganesh Naik: पालघरमध्ये वन उद्यान निर्माण होणार, पालकमंत्र्यानी प्लॅनच सांगितला

SCROLL FOR NEXT