Manohar Joshi Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manohar Joshi: 'मी मुख्यमंत्री पण वाहन महापौरांचं..', मनोहर जोशींनी का वापरली फडणवीसांची गाडी? सांगितला भावूक किस्सा

Devendra Fadanvis on Manohar Joshi: मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी महापौर फडणवीसांची वापरली गाडी; फडणवीसांनी सांगितला तो किस्सा

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. सच्चा शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते सर्व पक्षातील नेत्यांशी आपुलकीने वागत असत, त्यांच्या निधनानंतर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.(Devendra Fadanvis on Manohar Joshi)

यावेळी त्यांनी मनोहर जोशी यांच्यासोबतच्या भेटीतील एक किस्सा देखील सांगितला आहे. जोशी सर म्हणजे राजकारणातील सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व. ते मुत्सुदी राजकारणी होते. मराठी माणूस काय करू शकतो हे त्यांनी दाखवले. शिवसैनिक, मुख्यमंत्री ते लोकसभा सभापती असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

उद्योग क्षेत्रातही त्यांनी नाव कमावले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम न विसरता येणारं आहे. समोरच्याला हसतखेळत ठेवण्याचे त्यांचे वर्तन त्यांचे जाणे राज्यासाठी मोठे नुकसान आहे. त्यांनी महाराष्ट्रात खूप काम केलं. ते न विसरता येण्यासारखं आहे.त्यांची भेट म्हणजे समृध्द होणं असायचं.

मी महापौर होतो व मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. ते नागपुरात अधिवेशनासाठी आले होते, तेव्हा त्यांची गाडी बंद पडली होती. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं दुसरी गाडी आपल्याला पाहिजे असेल तर, महापौरांची गाडी चांगली आहे, ती घेता येईल. मला निरोप आला की, भेटायला या. मी भेटायला गेलो तेव्हा मला म्हणाले की, माझी गाडी बंद पडली आहे, माझ्याकडे गाडी नाहीये मला नागपुरच्या महापौरांचं वाहन मिळेल का? मी म्हणालो, हा आमचा बहुमान आहे. त्यांनी ते वाहन दोन ते तीन दिवस वापरलं, ते दोन ते तीन सभेत गेले तिथे ते म्हणायचे, मी मुख्यमंत्री म्हणून आलो असलो तरी, मी वाहन मुख्यमंत्र्यांचं नाही तर, महापौरांचं आणलं आहे. त्यांची भेट समृध्द करायची, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT