Maratha Reservation Special Session Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation Special Session: फसवणूक नको आरक्षण हवं! विशेष अधिवेशनात का होतोय मराठा आरक्षण विधेयकाला विरोध?

Maratha Reservation Bill: मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे, मराठा आरक्षणासाठी आता अवघ्या काही मिनिटात विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Maratha reservation: मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे, मराठा आरक्षणासाठी आता अवघ्या काही मिनिटात विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच राज्यातील वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवे असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठा समाजावर इतर आरक्षण थोपविल्यास आंदोलनाची दिशा ठरविण्याचा इशारा त्यांनी दिला. तर दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचं स्पष्ट करत, ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

दरम्यान, आज मराठा समाजाला आरत्रण मिळावे यासाठी अधिवेशन पार पडत असतानाच काही आमदार याला विरोध करताना दिसत आहेत. आमची सरकारकडे मागणी आहे की, मनोज जरांगे जे मुद्दे मांडत आहेत ते विचारात घ्यावेत. जरांगे पाटील यांच्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ज्यांचे कुणबी दाखले सापडले आहेत त्याचे काय होणार? फक्त निवडणुकीच्या काळात सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे, परत समाजाची फसवणूक होऊ नये असंही आमदारांनी म्हटलं आहे.

फसवणूक नको आरक्षण हवं, काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचं लक्षवेधी जॅकेट

काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांच्या जॅकेटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आमची सरकारकडे मागणी आहे की मनोज जरांगे जे मुद्दे मांडत आहेत ते विचारात घ्यावेत.जरांगे पाटील यांच्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. फक्त निवडणुकीच्या काळात सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. परत समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून हा पोशाख घातला आहे, असं धीरज देशमुख यांनी म्हटलं आहे.

आमदारांचा विरोध का?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज हे तिसरं विशेष अधिवेशन आहे, मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देणार असं मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी वारंवार म्हणतात. दुसरीकडे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असंही सांगण्यात येते. राज्य सरकार टांगती तलवार आहे. त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी दबाव असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, हा कायदा कोणत्या आधारावर टिकणार आहे याचं स्पष्टीकरण समोर आलेलं नाही.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणारे आहे. त्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात कसे टिकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं वेगळं आरक्षण देऊ नये असं मनोज जरांगेंसह काही आमदारांचं म्हणणं आहे.

अशातच स्वांतत्र्य संवर्गातून दिलेलं आरक्षण मनोज जरांगे यांनी अमान्य असल्यातचं म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर असहमती दर्शवली आहे. मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची सरकारने घोषणा केली आहे. आम्हाला हे आरक्षण मान्य नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे. सरकारने विनाकारण नको त्या गोष्टी पुढे आणू नये. आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. उलट आता आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

किम जोंग उन मुलीला सोबत घेऊन चीनमध्ये दाखल, उत्तर कोरियाची पुढची हुकुमशहा?

Pune News:'जमिनींवरील ‘एमआयडीसी’चे शिक्के काढणार'; पुरंदर विमानतळातून कपात केलेल्या क्षेत्राबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

Virat Kohli ला स्पेशल ट्रिटमेंट! थेट परदेशात फिटनेस टेस्ट, बाकीच्यांची बंगळुरूत; कोण पास, कोण फेल... ते वाचा

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेची पाणीपातळी दोन फुटांनी वाढली; राधानगरी धरणातून ४३५६ क्युसेक विसर्ग सुरू

Pune Ganesh Festival:'भाविकांना देखाव्यांची भुरळ'; पुण्याच्या मध्यवर्ती भागातील रस्ते गर्दीने फुलले

SCROLL FOR NEXT