Dr Jitendra Awhad sakal media
महाराष्ट्र बातम्या

रॅकेट उद्ध्वस्त करणारच! आव्हाडांनी सांगितलं परीक्षा रद्दचं कारण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आरोग्य भरती घोटाळा, पेपरफुटीच्या प्रकरणांनी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हैराण असतानाच आता याचप्रकारचं आणखी एक ढिसाळ कारभाराचं उदाहरण समोर आलं आहे. राज्यातील म्हाडाच्या परीक्षा (MHADA Exam Cancelled) ऐनवेळी रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री दोन वाजता केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारच्या ढिसाळ कारभारामुळे संतप्त असणारे विद्यार्थी आणखीनच क्रोधित झाले आहेत. मात्र, ही परीक्षा का रद्द करण्यात आली आणि त्यामागची भूमिका काय होती, याबाबतचा खुलासा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता पत्रकार परिषद घेत केला आहे.

याबाबतची सविस्तर भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटलंय की, पेपरफुटीची शक्यता निर्माण झाली होती. गोपनियतेचा भंग झाल्यानंतर लाखो मुलांवर अन्याय होऊ शकतो, अशी शंका व्यक्त केल्यानंतर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पेपर घेऊन नंतर कळलं असतं तर जगाला तोंड दाखवायला जागा राहिली नसती. पेपरफुटीच्या आधीच पोलिसांनी टोळीचं कारस्थान उघडकीस आणलं, हे बरं झालं. मात्र, त्यातून होणाऱ्या गैरसोयीबद्दल मी विद्यार्थ्यांची माफी मागतो, असं त्यांनी म्हटलंय.

परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबाबत टीका होतेय, यावर ते म्हणाले की, अनेक जण टीका करतायत मात्र, भविष्याच्या दृष्टीने बरं झालं. ही टोळी उद्ध्वस्त करावी लागेल. त्यामुळे आता पोलिस कारवाई चालू आहे. म्हाडाने पोलिसांकडे तक्रार केलीय. पोलिसांनी गोपनियतेचा भंग झाला याची तक्रार नोंदवून घेतली आहे. पेपरफुटी झालेली नाहीये. त्याआधीच हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार कसे रोखता येईल, यावर आम्ही आधीपासून चर्चा करत होतो. पेपर लीक होण्याआधीच कारवाई करण्यात यश आलं. महाराष्ट्रामधील सगळ्या परीक्षांचे दलाल हे साधारण एकाच टोळीतील आहेत. मी ग्रामीण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो की, याबाबबतची तक्रार शहरातून आलेली नाही. ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकडून आली, असं त्यांनी म्हटलंय.

विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की, याच्यानंतर जेंव्हा म्हाडा परीक्षा घेईल तेंव्हा ती स्वत: घेईल. सगळी जबाबदारी स्वतावर घेऊन परीक्षा पार पाडेल. पोलिस पुढचा तपास करत आहेत. गोपनियतेचा भंग झाला हे मात्र स्पष्ट झालं. याबद्दल समस्त विद्यार्थ्यांची माफी मागतो तसेच घोषित करतो की, आता म्हाडाने निर्णय घेतलाय की या परीक्षेची फी म्हाडा परत करेल. तसेच पुढची परीक्षा घेतान कुठलीही फी आकारण्यात येणार नाही. या दलालांना मी धडा शिकवीन, असं मी आधीच बोललो होतो. जर ही परीक्षा झाली असती तर जे परीक्षार्थी अभ्यास करुन आले त्यांच्यावर अन्याय झाला असता. टीकेला सामोरे जावं लागलं तरी चालेल पण विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होता कामा नये, असं वाटतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT