why vedanta foxconn project could not came in maharashtra says CM Eeknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Vedanta Foxconn ...म्हणून महाराष्ट्रात फॉक्सकॉन प्रकल्प येऊ शकला नाही; CM शिंदेंनी सांगितले कारण

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, तो राज्याला का मिळू शकला नाही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. (why vedanta foxconn project could not came in maharashtra says CM Eeknath Shinde)

शिवसेना-भाजप युतीचे नवे सरकार स्थापन होऊन दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील असे सांगण्यात आले होते.

तसेच, तळेगावजवळील ११०० एकर जमीनही देण्यात आली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या. असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

दरम्यान, रेल्वेमंत्री, केंद्रीय उद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली. राज्यात नवीन उद्योग, प्रकल्प आणण्यासाठी पूर्ण क्षमता आहे आणि सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याचा प्रयत्न करू, राज्यात नवीन उद्योग येण्यासाठी केंद्राचे सहकार्य आवश्यक आहे. यासंदर्भात केंद्रातील नेत्यांची भेटही घेणार आहे. राज्यात नवीन प्रकल्प आणण्याबाबत आमचे सरकार नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT