Aaditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Aaditya Thackeray: दिशा सालियानाच्या मृत्यूदिवशी आदित्य ठाकरे हॉस्पिटलमध्ये का होते?

सकाळ डिजिटल टीम

हिवाळी अधिवेशनादरम्यान, दिशा सालियाना मृत्यू प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी दिशा सालियाना मृत्यूवरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच या सर्वांवर मौन सोडत तिच्या मृत्यूदिवशी हॉस्पिटलमध्ये का होते? याचा खुलासा केला आहे. (Why was Aditya Thackeray in the hospital on the day of Disha Salian)

दिशा सालियाना हिचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्याच दिवशी माझ्या आजोबांचे निधन झाले होते. आजोबांचे निधन झाल्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यामुळे त्यांना जे काढायचे ते काढू द्या, असे म्हणत प्रथमच त्या हॉस्पिटलमध्ये उपस्थित असण्याबाबत भाष्य केलं.

Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

दिशाच्या मृत्यूप्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव वारंवार घेतले जात आहे. विशेषतः राणे कुटुंबीयांंकडून त्यांच्यावर यावरून वारंवार निशाणा साधण्यात येत होता. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत याबाबतचे भाष्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यावरून गेली दोन दिवसांपासून गदारोळ माजला आहे. विधानसभेत गुरुवारी त्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. विरोधकांना काय काढायचे ते काढू द्या. पण एका ३२ वर्षाच्या युवकाला हे खोके सरकार घाबरले आहे. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही विधानभवनाच्या पायऱ्यावर बसणार आहोत, असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

Alegaon Paga Murum Scam: आलेगाव पागा पाझर तलावातील कथित अवैध मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती? पर्यावरणप्रेमींची वरिष्ठ चौकशी व फेरपंचनाम्याची मागणी

Sillod Farmer: पीक कर्ज, पाण्याअभावी वाळलेले पीक; सिल्लोड तालुक्यात ३० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

SCROLL FOR NEXT