cm eknath shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: 'आजारपणाचं कारण देत शिंदेना मुख्यमंत्री पदावरून दुर केलं जाणार? 'या' नेत्याने व्यक्त केली शंका

शिंदेंऐवजी अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? असा सवाल नेत्याने उपस्थित केला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच अनेक नेते आपल्या शंका आणि अंदाज वर्तवताना दिसतात. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? असा सवाल करत शंका उपस्थित केल्या आहेत.

'आजारपणाचं कारण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन दुर करण्याचे प्रयत्न आहेत अशी शंका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केली आहे. शिंदेऐवजी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? असा प्रश्न विजय वड्डेटीवार यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणालेत विजय वड्डेटीवार?

'एकूणच आरोग्याचे कारण देत त्यांना अॅडमिट करायचं, आणि आरोग्याच कारण पुढे करत त्यांच्याकडून राजीनामा घ्यायचा आणि अजित पवारांना मुख्यमंत्री करायचा प्रयत्न तर सुरू नाही ना? अशी शंका घेण्यासाठी पुर्णता वाव आहे. कारण आता जी दोघांची भुमिका आहे, त्यामधुन दिसुन येत आहे.'

'अधिवेशनातही एकनाथ शिंदे यांचा सहभाग कमी होता. त्यांची उपस्थिती कमी होती. त्यांचं बोलणंही कमी होतं. त्यानंतर सामाजिक कार्यक्रमांना जाणं टाळणं, आराम करण्यासाठी बाहेर जाणं, मग तब्येतीची काळजी घेणं, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, राज्याला त्यांची काळजी असते. त्याचबरोबर मुख्यमंत्री केवळ एका पक्षाचे नाहीत. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं त्याचा खुलासा स्पष्ट होणं हे अपेक्षित आहे, असंही विजय वड्डेटीवार पुढे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT