Dilip Walse Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Unseasonal Rain: नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करणार; मंत्री दिलीप वळसे पाटलांची ग्वाही

सकाळ डिजिटल टीम

आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागासह अन्य भागात रविवारी (ता.२६) दुपारी गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. कांदे, बटाटा, वाटाणा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे केले जातील.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम मिळवून देण्यासाठी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत पाठपुरावा केला जाईल. ”अशी ग्वाही राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. वळसे पाटील यांनी पुण्याचे नियोजित दौरा रद्द करून सोमवारी (ता.२७) कुरवंडी, भावडी,थूगाव, कारेगाव या परिसरात शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी उपस्थित असलेले आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, तहासिलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज, सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ, सहाय्यक निबंधक (सहकार) विठ्ठल सूर्यवंशी यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे व जिल्हाधिकारी पुणे यांना अहवाल सादर करण्याचे आदेश वळसे पाटील यांनी दिले.

वळसे पाटील म्हणाले “राज्याच्या अनेक भागात गारपीट व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाबरोबरच मोठ्या आकाराच्या गारा पडल्या त्यामुळे पिकांची पाने गळून पडली आहेत.

तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहेत. वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार अजूनही पाऊस पडण्याची शक्यता आहे.आलेल्या नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकार मदत करणार आहे.”

दरम्यान आदर्शगाव कुरवंडीच्या सरपंच मनिषा सुनिल तोत्रे, शेतकरी लक्ष्मण गावडे,विकास बारवे यांनी झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती सांगितल्यानंतर वळसे पाटील यांच्यासह अधिकारी वर्ग भावनावश झाले उपस्थितांची मने हेलावली.

यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव, उपसभापती सचिन पानसरे,संतोष धुमाळ, विकास बारवे थुगावचे उपसरपंच भूषण एरंडे, कृषी सहाय्यक प्रमिला मडके उपस्थित होत्या.

“अनेक शेतकऱ्यांनी बँका व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्याकडून कांदा, बटाटा व अन्य पिकांसाठी कर्ज घेतले आहे. अनाहूतपणे आस्मानी संकट कोसळल्याने हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने पळवून नेला आहे. सरकारने लवकर मदत केली नाही.तर शेतकऱ्यांना जगणे अवघड होईल.”

जितेंद्र तोत्रे, उपसरपंच आदर्शगाव कुरवंडी (ता.आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT