Will Make Pune a number one city for sustainable development says Devendra Fadnavis
Will Make Pune a number one city for sustainable development says Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

पुण्याला शाश्वत विकासाचे देशातील क्रमांक एकचे शहर बनवू : मुख्यमंत्री

उमेश घोंगडे

पुणे : देशातील शाश्वत विकासाचे क्रमांक एकचे शहर बनण्याची पुण्याची क्षमता आहे. गेल्या चार वर्षांत त्या दिशेने आम्ही काम करीत आहोत. पुण्याच्या सर्वांगीण विकास करून पुण्याला देशातील क्रमांक एकचे शहर बनवू असा, निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) केला. खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. 

म्हाळुंगे-माण हायटेक सिटीच्या कामाचे भूमीपूजन आज झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या माध्यमातून पुण्यात येत्या दोन वर्षांत दोन लाख रोजगार निर्माण होतील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याचा लौकिक आहे. स्टार्टअपमध्येदेखील पुण्याचाच पहिला क्रमांक असल्याचे केंद्र सरकारच्या पाहणीत स्पष्ट झाल्याने देशाचे स्टार्टअप कॅपिटलदेखील पुणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पुण्याच्या विकास कामांवर गेल्या चार वर्षांत विशेष लक्ष दिल्याचे सांगून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, " गेल्या वीस वर्षात ज्यांनी पुण्यासाठी काहीच केले नाही ते आता आमच्यावर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नव्या कार्यसंस्कृतीची सुरवात केली आहे. 'आयुष्यमान भारत', 'उज्वला गॅस योजना', प्रत्येक घरात वीज, मुद्रा कर्ज योजना, गृह योजनेसाठी अनुदान या प्रकारच्या नव्या योजना सुरू करून एक इतिहास निर्माण केला आहे. पुण्यात दोन लाख घरांची गरज असून, ही गरज आपण नक्की पूर्ण करू. समारे10-11 कोटी लोकांना रोजगार देणारी मुद्रा योजना जगातील अशा प्रकारची एकमेव योजना आहे.'' 

कार्य अहवाल प्रकाशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार शिरोळे यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, लोकसभेच्या कामकाजात पूर्णवेळ सहभागी होणारे खासदार पुणेकरांना लाभले आहेत. खासदार म्हणून शिरोळे यांना पंतप्रधान मोदी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते याचा मलादेखील हेवा वाटतो, या शब्दात त्यांनी खासदार शिरोळे यांचे कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT