MLA Disqualification Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेप्रकरणी मोठी अपडेट! आजी-माजी मुख्यमंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष पाठवणार नोटीस

आजी-माजी मुख्यमंत्र्यांना नोटीस लवकरच नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरणात गाजलेल्या आमदार अपात्रतेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येत्या एक-दोन दिवसांत नोटीस पाठवणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांना आमदार अपात्रतेबाबत आपली बाजू मांडावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष लवकरच नोटीस पाठवणार असल्याची माहिती आहे.

आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीसाठी दोन्ही गटांच्या पक्षप्रमुखांना आपली बाजू एक- दोन आठवड्यामध्ये मांडण्यासाठी ही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव होती. त्यावर निकाल देताना कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं होतं.

मागच्या सुनावणी वेळी काय झालं?

दोन्ही गटांच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडं आपली बाजू मांडली. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांकडून दोन वकिलांनी नार्वेकर यांच्यासमोर बाजू मांडली. यावेळी दोन्ही गटांच्या आमदारांची एकत्रित सुनावणी घेण्याच्या ठाकरे गटाच्या मागणीला शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाची मागणी मान्य करत या गटाच्या आमदारांच्या सुनावणीसाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळं आता आमदार अपात्रतेची सुनावणी लांबवणीवर पडली आहे.

शिंदे गटाचं म्हणणं काय?

ठाकरे गटानं सादर केलेली कागदपत्रे अद्याप आम्हाला मिळालेली नाहीत. त्यामुळे आमची बाजू मांडण्यात अडचणी येत आहेत. गणेशोत्सव असल्याने आम्हाला दोन आठवड्यांचा वेळ द्यावा, त्यानंतर आम्ही अभ्यास करुन उत्तर पाठवू. यावर दोन्ही गटांना याचिकार्त्यांची याचिकांची प्रत देण्यात येईल, असं सांगताना १० दिवसांत शिंदे गटाच्या आमदारांनी याचिकेवर लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश नार्वेकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT