hasan mushrif Esakal
महाराष्ट्र बातम्या

वाईनचा निर्णय शेतकरी हिताचा, भाजपचा विरोध का? हसन मुश्रीफांचा सवाल

मध्यप्रदेशात घराघरात वाईन वाटली जाते तिथे भाजप काहीही बोलत नाही;हसन मुश्रीफ

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सरकारने वाईन (Wine) सुपर मार्केटमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशात घराघरात वाईन वाटली जाते तिथे भाजप बोलत नाही असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी आज लगावला.आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Wine Selling in Super Market)

सरकारचा हा निर्णय द्राक्ष उत्पादकांसाठी दिलासा देणार आहे. मात्र दारूबंदी प्रबोधन करून झाली पाहिजे. दारू बंदी बाबत लोकांनीही मनावर घेतल पाहिजे. राजकीय पक्षांनी दारू बंदी बाबत प्रबोधन करण्याची गरज आहे.

ते म्हणाले,मध्यप्रदेशात घराघरात वाईन वाटली जाते तिथे भाजप बोलत नाही . मंत्रिमंडळापुढे जेव्हा हा विषय आला होता. त्यावेळी या संदर्भात सखोल चर्चा झाली. राज्यातील द्राक्ष पिकवणाऱ्या प्रदेशाला या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयावर सरकारने अध्यादेश काढून घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने आयात केलेल्या मद्यावरील शुल्काचा दर 300 टकक्यांवरून 150 टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले होते. तसेच आता किराणा दुकान आणि जीवनावश्यक वस्तू मिळण्याच्या ठिकाणी म्हणजेच सुपर मार्केटमध्ये सुद्धा वाईन विक्री केली जाणार आहे. पण त्यासाठी किराणा दुकान हे एक हजार चौरस फुटापेक्षा मोठं असलं पाहिजे ही अट घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT