Vijay Wadettiwar esakal
महाराष्ट्र बातम्या

Vijay Wadettiwar : मंजूर झालेली विधेयकं तरुणांना देशोधडीला लावणारी!, विजय वडेट्टीवारांनी काढले सरकारचे वाभाडे

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. सभागृहात ऑनलाईन गेमच्या संदर्भात मंजूर झालेल्या विधेयकांवरुन विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

संतोष कानडे

नागपूरः राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. सभागृहात ऑनलाईन गेमच्या संदर्भात मंजूर झालेल्या विधेयकांवरुन विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंजूर झालेल्या पाच विधेयकांवरुन नाराजी व्यक्त केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, कॅसिनोवरील बिल आणलं आणि मंजूर झालं. परंतु ऑनलाईन गेमिंग आणि अॅप्सला जीएसटीच्या कक्षेत आणल्याने त्यांना खुलेआम चालवण्याचा परवाना मिळाला आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्याने राज्य सरकारने असा निर्णय घेतल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, मंजूर झालेली बिलं विचित्र आणि भयावह आहेत. हे सरकार सामान्यांच्या भल्यासाठी आहे की बिल्डरांच्या भल्यासाठी? असा प्रश्न उपस्थित होतोय. अशा गेम्समधून पैसा कमवायला हे सरकार भिकारडं आहे का? यांना ऑनलाईन कॅसिनोमधून पैसे मिळवायचे आहेत का?

''तरुणांना उद्ध्वस्त करण्याचं काम सरकार करीत आहे. हाताला तर काम द्यायचं नाही परंतु पिढी बरबाद करण्याचं काम सुरु आहे.. पाच बिलं मंजूर केली आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे'' अशी सणसणीत टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT