Women Startup Grant sakal
महाराष्ट्र बातम्या

Women Startup Grant: महिला स्टार्टअपला राज्य शासनचे बुस्टर; लाखोंचे मिळणार अनुदान,वाचा कुठे करता येणार अर्ज?

Eknath Shinde: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना; एक लाख ते २५ लाख रुपयांचे अनुदान

सकाळ वृत्तसेवा

Punyashlok Ahilya Devi Holkar Yojana: राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आणली आहे. या माध्यमातून उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना नव्या संधी उपलब्ध होत आहेत. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थिनींनी स्टार्टअप संकल्पना समोर ठेवून काम करावे अशी शासनाची अपेक्षा आहे.

महिला नेतृत्वातील स्टार्टर्स ला विविध प्रकारची आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते. विशेष मदतीशिवाय किंवा निधी अभावी त्यांचे स्टार्टअप यशस्वी होत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावरच विद्यार्थिनी मधून स्टार्टअपच्या संकल्पना याव्यात आणि त्या इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विकसित केल्या जाव्यात.

या योजनांना अर्थसाहाय्य मिळाल्यास महिला रोजगार निर्मितीतही वाढ होणे अपेक्षित आहे. स्थानिक गरजांवर आधारित व स्थानिक कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर हे स्टार्टअप विकसित होऊ शकतात. त्यासाठी ही योजना आखली गेली.

योजनेची वैशिष्ट्ये

महिला नेतृत्वाच्या पाठबळ व अर्थसाहाय्य करणे

महिला स्टार्टअप स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे

देशातील सर्वाधिक महिला स्टार्टपचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे

बेरोजगारी कमी करणे

प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअपला उलाढालीनुसार १ ते २५ लाखापर्यंत आर्थिक साहाय्य

केंद्र सरकारच्या उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागांमध्ये नोंदणीकृत झालेल्या महिला स्टार्टअपला संधी

स्टार्टअप मधील महिला संस्थापक व सह संस्थापक यांचा किमान ५१ टक्के वाटा स्वतःचा असावा

स्टार्टअप एक वर्षापासून कार्यरत असावे

स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल १० लाख ते १ कोटी असावी

राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदान मिळाले नसावे

असा मिळेल लाभ

योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा. रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांना अधिक प्राधान्य असेल. स्टार्टअपचे सादरीकरण सत्र आणि मूल्यांकन निकषाद्वारे निवड झाल्यानंतर या स्टार्टअपला अनुदान दिले जाईल.

केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत. कृषी विभागामार्फत पी. एम. एफ. एम. ई. योजनेंतर्गत उद्योग-व्यवसायासाठी अनुदान दिले जात आहे. आतापर्यंत शासनाच्या या योजनांच्या माध्यमातून ३५ महिलांना पुरूष यांना उद्योग उभारणीसाठी शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.

- अपूर्वा तोरडमल, भिंगार

डी. आर.पी. (पी.एम.एफ.एम.ई. योजना)

सदस्या, कृषी विभाग,अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT