Breast Cancer sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात ४० टक्‍के महिलांना स्‍तन कर्करोगाचा उच्‍च धोका

‘इंडस हेल्‍थ प्‍लस’चा अहवाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील ४० टक्‍के महिलांना (Women's) स्‍तनाचा कर्करोग (Breast cancer) होण्‍याचा उच्‍च धोका असल्याचे एका अहवालातून (Report) स्पष्ट झाले आहे; तर २५ टक्‍के महिलांना अनुवांशिक स्‍तन कर्करोगाचा (Genetic breast cancer) उच्च धोका (high risk) असल्याचेही निरीक्षण ‘इंडस हेल्‍थ प्‍लस’च्या अहवालातून समोर आले आहे.

स्‍तन कर्करोगासाठी केलेल्या तपासण्‍यांच्‍या आधारे हे संशोधन करण्‍यात आले आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत राज्यात केलेल्‍या ‘मॅमोग्राफी’ तपासण्‍यांसंदर्भात निरीक्षण करण्‍यात आले. ४० टक्‍के महिलांमध्‍ये काही असामान्य निष्‍पत्ती आढळून आल्‍या. यापैकी ३७ टक्‍के महिलांमध्‍ये सौम्‍य निष्‍पत्ती आढळून आल्‍या आणि या निरीक्षणातून पुढील सल्‍लामसलत वा नियमित तपासणीची शिफारस करण्‍यात आली, परंतु उर्वरित तीन टक्‍के महिलांना स्‍त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगण्यात आले. या संशोधनामध्‍ये ५,५७० महिलांचे सर्वेक्षण करण्‍यात आले.

जीवनशैलीत बदल केल्यास स्तन कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. ४० वर्षांवरील महिलांसाठी सुरुवातीच्‍या टप्प्यात स्‍तन कर्करोगाचे निदान करण्‍यासाठी मॅमोग्राफी करण्‍यावर भर देण्याचा सल्ला दिला जात आहे. आम्‍ही महिलांना नियमितपणे आणि वेळेवर तपासण्‍या करण्‍यासदेखील प्रोत्‍साहित करत आहोत असे ‘प्रीव्‍हेन्टिव्‍ह हेल्‍थकेअर स्‍पेशालिस्‍ट’ अमोल नायकवडी यांनी सांगितले.

- राज्यात ४,५०० अनुवांशिक चाचण्‍या
- संशोधनातून २५ टक्‍के महिलांना स्‍तन कर्करोगाचा उच्‍च धोका

तपासणी कशी?
- स्‍वयंमूल्‍यांकन केल्‍यानंतर स्‍त्रीरोगतज्ज्ञाला भेट द्या
- ६ ते ८ महिन्ं‍यातून मंथली सेल्‍फ ब्रेस्‍ट चाचणी, क्लिनिकल ब्रेस्‍ट चाचणी-तपासण्‍या करा
- ३५ ते ४० वर्षे वयोगटातील महिलांनी वर्षातून एकदा सोनो-मॅमोग्राफी, मॅमोग्राफी / ब्रेस्‍ट एमआरआय करा.
- ४० वर्षांवरील सर्व महिलांना वर्षातून एकदा मॅमोग्राफी करण्‍याचा सल्‍ला देण्‍यात येत आहे.
- लठ्ठपणा आणि उच्‍च बीएमआयचा वाढता धोका असलेल्‍या महिलांनी वजनावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: बिंदुसरेत आढळला चिमुरडीचा मृतदेह; बीड शहरामधील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

Gadchiroli News: पावसात धानाचे पुंजणे वाचवताना १७ वर्षीय मुलाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू; कोरची तालुक्यातील शेतातील दुर्घटना

Latest Marathi News Live Update : नाशकात ट्रकच्या धडकेत पादचाऱ्यांचा मृत्यू

Vote Theft: निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

औरंगाबाद नाही, आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक; अधिकृत बदल, नवा कोडही जारी

SCROLL FOR NEXT