Womwn s commission send notice to bjp chandrakant patil over statment against ncp supriya sule  
महाराष्ट्र बातम्या

सुप्रिया सुळेंविरोधातील 'ते' विधान चंद्रकांत पाटलांना भोवलं; महिला आयोगाची नोटीस

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणे महागात पडलं आहे, त्यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांना सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागला होता, दरम्यान आता महिला आयोगाने त्यांना याप्रकरणी नोटीस पाठवली आहे.

पुणे शहर लीगल सेलचे अ‌ॅड. असीम सरोदे व सहकारी यांनी राज्य महिला आयोगास निवेदन देण्यात आले असून. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांना लेखी खुलासा मागण्यात आला आहे. ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज मिळाला असून आपल्या सारख्या लोकप्रधिनिधींकडून असे वक्तव्य होणे खेदाची बाब आहे, असे म्हटले आहे.

तसेच महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान आपण राखावे असे, महिला आयोगाने चंद्रकांत पाटील यांना सांगितले आहे. तसेच त्यांना महिली आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार दोन दिवसात लेखी खुलासा सादर करावा, असे सांगण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना सुप्रिया सुळेंवर टीका केली होती, ते म्हणाले होते की, कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंपाक करा. खासदार आहात ना तुम्ही, कळत नाही मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची. कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झालीये. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या, असे चंद्रकांत पाटील सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल बोलले होते. त्यांच्या वक्तव्याने महिलेचा अपमान झाल्याचे बोलले जात आहे.

चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर सुप्रिया सुळेंचे पती तसेच अनेक राजकीय नेत्यांकडून त्यांच्या विधानाबद्दल नाराजी व्यकत् केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election : गोंधळच गोंधळ! नांदेडमध्ये मतदारांना कोंडलं, अंबरनाथला बोगस मतदार आणले, तर कोपरगावात उमेदवारांमध्ये बाचाबाची

Nashik Crime : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! 'पोक्सो'मधील फरार संशयित गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Latest Marathi News Live Update : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा

Kolhapur Muncipal : विधानसभा निवडणुकीसारखीच खर्च दरसूची; उमेदवारांच्या खर्चावर करडी नजर

Divyang Marriage Scheme : आता विवाहासाठी दिव्यांगांना मिळणार 'इतके' लाख रुपये; निम्मी रक्कम असणार फिक्स डिपॉझिट, कागदपत्रे आणि अटी काय?

SCROLL FOR NEXT