election-workers.jpg
election-workers.jpg 
महाराष्ट्र

निवडणुकीत 'प्रचारमजूर' म्हणून डिमांड; दिवसाला 'इतकी' मजुरी

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा

मनमाड : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने प्रचाराला वेग आला आहे. प्रचाराला माणसे लागत असल्याने उमेदवारांमध्ये माणसांना डिमांड असल्याने असंघटित मजुरांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे. त्यामुळे हातमजुर कामगारांपैकी अनेकांची रोजीरोटीची चिंता निवडणुकीपुरते का होईना, मिटणार आहे. 

निवडणुकीमुळे मिळाले कामगारांच्या हाताला काम
निवडणूक म्हटली की प्रचार आला आणि प्रचार आला की प्रचारासाठी गर्दी लागणार. त्यामुळे गर्दी करण्यासाठी माणसांची गरज लागते. गर्दीसाठी लागणारी  माणसे उमेदवाराजवळ असणे शक्य नाही. कार्यकर्ते, नातेगोते, मित्रमंडळी धरली तरी गर्दी दिसणार नाही आणि सध्याच्या काळात कोणत्याच पक्षाकडे कार्यकर्ते राहिलेले नाही गर्दीतील दर्दी, प्रामाणिक, पक्ष विचारधारेशी  बांधील, एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते सध्या दुर्मिळच म्हणावे लागेल परंतु पक्ष म्हटला की निवडणुका आणि निवडणुका म्हटल्याकी गर्दी आलीच त्यामुळे प्रचार करण्यासाठी माणसांची फार वानवा असते लांबून माणसे आणावी लागतात.

दिवसाला दोनशे ते पाचशे रुपये रोज

गर्दी जमवतांना उमेदवारांच्या नाकी नऊ येतात. प्रचाराला रोजाने माणसे आणली जातात. दोनशे ते पाचशे रुपये रोज मिळत असल्याने खुशीने महिला पुरुष प्रचाराच्या कामाला जातात शहरी भागासह ग्रामीण भागातील महिला पुरुष मजूर उन्हातान्हात काम करण्याऐवजी केवळ प्रचाराच्या फिरण्याच्या कामाला जात असल्याचे चित्र आहे सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे या मजुरांच्या हातांना काम मिळू लागले आहे. रोजगार मिळतोच परंतु जेवणही मिळत आहे त्यामुळे सारेच हातमजूर, शेतमजूर प्रचाराला जात असल्याने बिगारी काम अथवा शेतीकामाला मजूर मिळणे कठीण झाले आहे 

प्रतिक्रिया 

 काम धंदा नाही. पोटाला तर खायला लागते त्यामुळे मिळेल तिकडे मोलमजुरी करावी लागते सध्या निवडणुकीत कामे मिळत असल्याने रोजंदारी मिळत आहे त्यामुळे निवडणूक आहे तोपर्यंत रोजंदारी मिळेल मात्र त्यानंतर जिथे काम करत होतो तिथे जावे लागेल - अंजनाबाई शिंदे, मजूर 

निवडणुकीमुळे रोजंदारी मिळत आहे निवडणुकीसंदर्भातील अनेक कामे असल्याने आमच्या सारख्या हातमजुरांना काम उपलब्ध झाले आहे जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत हाताला काम मिळेल त्यानंतर पुन्हा कामाची शोधाशोध कायम असेल. - सखाहरी गायकवाड, हातमजूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT