Wai Taluka esakal
महाराष्ट्र बातम्या

स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीच्या मांडीवर 'कोंबडा' ठेऊन पूजन

विलास साळुंखे

सुरूर येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वाई (सातारा) : सुरूर (Surur Village) येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून स्मशानभूमीच्या कट्ट्यावर एका मुलीच्या मांडीवर 'कोंबडा' देऊन मांत्रिकानं पूजन केल्याचा हा प्रकार एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे. हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच, मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी व नातेवाइक बेपत्ता झाल्याचे कळतंय. मात्र, या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. वाई तालुक्यातील (Wai Taluka) सुरूर गावाच्या स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार घडलाय.

मांत्रिकाच्या आदेशानं मुलीला प्रथम वाईतील कृष्णा नदीत अंघोळ घालण्यात आली. तद्नंतर तिचं नदीकाठीचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर मुलीला सुरूर येथील स्मशानभूमीत पुजण्याचा घाट घालण्यात आला. पुणे हडपसर येथून आलेली ही मुलगी व तिचे नातेवाइक मांत्रिकासह फरार झाले असून याबाबतचा अधिक तपास वाई पोलिस करत आहेत. दरम्यान, या अंधश्रध्देच्या प्रकाराला नेमकं कोण जबाबदार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

सातारा हा अंधश्रद्धा निमुर्लन संस्थेचे संस्थापक नरेंद्र दाभोलकरांचा जिल्हा. या जिल्ह्यात बुवाबाजीच्या अनेक घटना आजही उघडकीस येत आहेत. ही बुवाबाजी मुळासकट उपटून टाकण्यासाठी समाजाने पुढाकार घेणं गरजेचं आहे. परंतु तसं होताना दिसत नाही. हे देखील तितकेच खरंय. या जिल्ह्यातील वाई तालुक्‍याला ऐतिहासिक परंपरा आहे. पुण्याप्रमाणं वाई देखील शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. अशा सुसंस्कृत वाई तालुक्‍यात काही ठिकाण अशी आहेत, जिथं जाऊन आजही लोक देवाला कौल लावतात. त्यातील एका ठिकाणाची उघड-उघड न होता दबक्या आवाजात कायम चर्चा होत असते. त्या गावाचं नाव 'सुरूर' असं कळतंय. यापूर्वी देखील या गावात असे प्रकार घडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT