Yashada
Yashada esakal
महाराष्ट्र

Yashada : महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम अधिकारी घडवणाऱ्या संस्थेला 'यशदा' का म्हणतात?

धनश्री भावसार-बगाडे

Yashada History And Work : एमपीएस्सी, युपीएस्सी या स्पर्धा परीक्षांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अत्यंत महत्वाचं ठिकाण, विद्यापीठ बाणेर रस्त्यावर देखणी आणि सहज लक्ष आकर्षित करून घेणारी इमारत म्हणजे यशदा.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा). यशदा ही महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. राज्य शासनाने यशदा प्रबोधिनी ही एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन केली आहे. यशदा महाराष्ट्र राज्याची शिखर प्रशिक्षण संस्था असून राज्य पातळीवरील विविध संस्था व विशिष्ट विषयांशी संबंधित प्राविण्य केद्र यांची संमिश्र रचना असलेली यशदा ही प्रबोधिनी आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे या प्रबोधिनीचे मुख्य संरक्षक असून राज्याचे ग्राम विकास मंत्री हे उपसंरक्षक आहेत. महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव हे यशदा नियामक मंडळाचे अध्यक्ष असतात. प्रबोधिनीचे नियमित कामकाज करण्यासाठी प्रमुख म्हणून भारतीय प्रशासन सेवतील प्रधान सचिव दर्जाचे वरिष्ठ अधिकारी यांची महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात येते. प्रबोधिनीचे प्रशिक्षण कार्यक्रम व इतर कामकाजचे निरिक्षण व पुनरावलोकन यशदाचे महासंचालक अध्यक्ष असलेल्या कार्यकारी समितीकडून करण्यात येते.

यशदाचे मुळ अधिकारी / कर्मचारी, प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणि ठराविक कालावधीसाठी नियुक्त केलेल्या तज्ञांचा व सल्लागारांचा प्रबोधिनीचे व्याख्याते, अधिकारी व इतर कर्मचारी म्हणून समावेश होतो. विद्याशाखा, प्रशासन विभाग, वित्त विभाग आणि इतर सोयीनुसार निर्माण केलेल्या विभागांच्या कामकाजामुळे यशदातील विविध उपक्रम सक्षमपणे पार पाडले जातात. प्रबोधिनीमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यशाळा, परिसंवाद / चर्चासत्रे व संशोधनात्मक प्रकल्प यशदातील विविध संस्था व केद्र यांच्यामार्फत यशस्वीपणे राबविले जातात.

अशी झाली यशदाची स्थापना

बॉम्बे जिमखाना ते बृहन्मुंबई पालिकेचं मुख्यालय दरम्यानच्या रस्त्याच्या शेवटी जुन्या कॅपिटॉल सिनेमाच्या समोर ‘ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज’ होतं. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची सेवेत निवड झाल्यानंतर प्राथमिक प्रशिक्षण तसंच पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत प्रशिक्षण या कॉलेजमध्ये दिलं जायचं. म्हणून आक्टोबर, १९८३ मध्ये राम प्रधान यांनी कुतूहलापोटी या कॉलेजला भेट दिली होती. 

पण तिथल वातावरण बघून ते थक्क राहीले. अशा वातावरणात अधिकारी कसे घडवणार, गावकडच्या मुलांना शिस्त कसे लावणार या काळजीने त्यांना शांत जागेची आवश्यकता वाटली. अशी उपयुक्त जागा त्यांना पुणे विद्यापीठाजवळ राजभवनच्या मागच्या बाजूस मिळाली. पहिले मीडा नावाने त्याचं उद्घाटन ३१ मे १९८४ मध्ये करण्यात आलं.

काही वर्षांनी शरद पवार यांच्या सरकारने या संस्थेचं नाव बदलल आणि तेव्हापासून ते आजतागायत आपण तिला ‘यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी’ म्हणजेच ‘यशदा’ नावाने ओळखतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT