Yashomati Thakur Esakal
महाराष्ट्र बातम्या

केंद्र, राज्य सरकारच्या दुफळीमुळे संविधानाला धोका- यशोमती ठाकूर

सर्व राज्यांमध्ये केंद्राच्या सगळ्या संस्थेचा दुरुपयोग होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: केंद्र आणि राज्य सरकारमध्ये फार मोठी दुफळी निर्माण झाली आहे. संविधानाच्या विरोधात या सगळ्या गोष्टी आहेत. काॅंग्रेसला (Congress) सोबत घेऊन जर आघाडी झाली तर याचा फायदा नक्कीच होईल. असे मत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्यक्त केले. आज त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.

सर्व राज्यांमध्ये केंद्राच्या सगळ्या संस्थेचा दुरुपयोग होत आहे. यामुळे सध्याच्या केंद्र सरकामुळे संविधान धोक्यात आहे अशी प्रतिक्रिया य़शोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.भाजप आणि शिवसेना नेते आरोप- प्रत्यारोप करत असताना शिव्यांचा वापर करत आहेत. यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, मला अस वाटतय हा वर्तनातील बदलाचा विषय आहे. शिव्यांचा वापर करत असताना शिवी महिलांना दिल्या जातात याचा निषेध आहे. याबाबत चौथे धोरण घेऊन येत आहोत. हे अतिशय व्यापक असे धोरण असणार आहे. १९ फेब्रुवारीला छत्रपतींच्या चरणी आम्ही ते धोरण ठेवले.

सर्व राज्यांमध्ये केंद्राच्या सगळ्या संस्थेचा दुरुपयोग होत आहे. यामुळे सध्याच्या केंद्र सरकामुळे संविधान धोक्यात

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तत्वानुसार हे धोरण असणार आहे. येत्या ८ मार्चला हे धोरण लागू होईल. वर्तनातील बदल येणे गरजेचे आहे. सावित्री घरोघऱी आणि जोतिबाचा शोध जारी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता जोतिबाचा शोध घेण्यासाठी आम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहे असे ही त्या म्हणाल्या.

निराक्षण करण्याची याआधी आधी गरज पडली नाही. मात्र, यापुढे ते राहील.यासाठी मोठी समिती स्थापन करतो आहोत. यामध्ये एक समिती मुख्यमंत्री यांच्या अधीपत्याखाली राहील.दुसरी महिला आणि बालकल्याण यांच्या अधीपत्याखाली असेल.आणि तिसरी समिती ही पालकमंत्री यांच्या अधीपत्याखाली असेल त्यामुळे याचा नक्कीच फायदा होणार आहे असे हा त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash : मोठी बातमी ! अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात, ६ प्रवाशांचा मृत्यू, बारामतीत लॅंडिंग दरम्यान दुर्घटना

Mumbai : कारवाईच्या बहाण्याने घरात घुसले, २० लाखांसह १५ तोळे सोन्याची चोरी; चार पोलिसांना अटक

Solapur politics: साेलापूर जिल्ह्यात ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात; पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४८५ जणांनी थोपटले दंड; मातब्बरांची माघार!

CJI SuryaKant: आरोपींसाठी शिक्षा वेदनादायक नसेल, तोपर्यंत...; सरन्यायधीशांचे मोठे संकेत! शिक्षेची तीव्रता वाढणार? मोदी सरकारही शॉक

Pune Crime: श्रीरामपूरमधील जप्त अमली पदार्थाची विक्री; पाच आरोपी ताब्यात १० किलो ७०७ ग्रॅमचा माल, वाहने हस्तगत!

SCROLL FOR NEXT