Mohit Kamboj 
महाराष्ट्र बातम्या

Yashwant Jadhav Case l इक्बाल सिंग चहल यांचीही चौकशी करा- कंबोज

आजपर्यंतच्या इतिहासात महापालिका आयुक्तांना आयकर विभागाने नोटीस पाठवली नाही.

सकाळ डिजिटल टीम

स्थायी सभापती यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यांशी संबंधित मालमत्तांवर आयकर विभागाने छापा टाकला होता. या प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना आयकर विभागाने बोलवल होत. पण ते या चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे आयकर विभागाने नोटीस बजावली. यावर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडले. काल किरीट सोमय्या यांनी चहल यांच्यावर निशाणा साधला होता. तर आज भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी आरोप केले आहेत.

मोहित कंबोज म्हणाले, आजपर्यंतच्या इतिहासात महापालिका आयुक्तांना आयकर विभागाने नोटीस पाठवली नाही हे पहिल्यांदाच झाले आहे. यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची आयकर विभागाने चौकशी करावी अशी मागणी मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

पुढे ते म्हणाले, यशवंत जाधव यांनी २२ महिन्यात ३६ मालमत्ता बनवल्या असून ३६० कोटींचा घोटाळा केला आहे. स्थायी समितीत जेवढे प्रस्ताव जातात, त्याचा अजेंडा आयुक्त लावतात. स्थायी समितीचा अजेंडा सेट करण्याचं काम आयुक्ताचं आहे. त्यामुळे जाधव यांनी केलेल्या भ्रष्टाचारात आयुक्तांची चौकशी का केली नाही? त्यांच्या परवानगी शिवाय भ्रष्टाचार होऊच शकत नाही, असही कंबोज म्हणाले.

भ्रष्टाचाराचा पाढा वाचताना कंबोज म्हणाले, ब्लॅकलिस्ट कंपन्यांना कोविडचं काम दिलं गेलं. इतका गंभीर भ्रष्टाचार महाराष्ट्रात झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला. त्याला लोवर लेव्हल म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रकार झाला. यावरून असे लक्षात येते की दाल में कुछ काला है असा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT